2023 Agrim Pik Vima

2023 Agrim Pik Vima : अग्रीम पीक विमा दिवाळीआधीच मिळणार, पीक विम्यासाठी 628 कोटी मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2023 Agrim Pik Vima: शेतकरी मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्यामध्ये सुरूवातीला पावसाचा मोठा खंड पडला आणि त्यानंतर अतिवृष्टी झाली.

त्यामुळे पीक विमा योजनेअंतर्गत 25% अग्रीम पीक विमा (2023 Agrim Pik Vima) मिळेल अशी आशा शेतकरी बांधवांना आहे. त्यातच स्वत: मुख्यमंत्री यांनी पीक विमा संदर्भात महत्त्वाची आढावा बैठक घेत शेतकर्‍यांना पीक विमा कंपन्यांनी संवेदनशीलतेने मदत करावी असे निर्देश दिले आहे.

अशातच आता दिवाळीआधी शेतकरी बांधवांना 25% अग्रीम पीक विमा मिळावा, यासाठी शासनाने 628 कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे.

👇👇👇

🏠 कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा, राज्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम जमा करणार

2023 Agrim Pik Vima

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आधीच केले आहे.

त्यातच दिनांक 05 ऑक्टोबर 2023 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 628 कोटी 43 लाख 43 हजार 542 रुपये पीक विमा कंपन्यांना वितरीत करण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना आता दिवाळी आधीच पीक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम मिळण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आपण दिनांक 05 ऑक्टोबर 2023 रोजीच्या शासन निर्णयाचा आढावा या लेखात घेणार आहोत.

👉👉 येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप चॅनल मध्ये जॉइन व्हा

पीक विम्यासाठी 628 कोटी 43 लाख रुपये मंजूर

सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार विमा हप्ता दराप्रमाणे येणारा शेतकरी हिस्सा विमा कंपन्यांना देय असून त्यामधील शेतक-यांनी प्रत्यक्षात भरलेला विमा हप्ता रक्कम रु.1/- प्रमाणे जमा झालेला शेतकरी हिस्सा रु.1.71 कोटी वजा जाता उर्वरीत शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम विमा कंपन्यांना देणे आवश्यक आहे.

तद्नुषंगाने, संचालक(विस्तार व प्रशिक्षण), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरुन, सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत पिक विमा योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विमा कंपन्यांना खरीप हंगाम 2023 मधील देय शेतकरी हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रु.628,43,43,542/- इतका निधी भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत संबंधित विमा कंपन्यांना वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी खालील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

👇👇👇

📃 सविस्तर शासन निर्णय येथे पहा

 

 

  • अशाच प्रकारच्या शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
  • विविध योजनांची माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी आमचे व्हाट्सअप चॅनल नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top