50-anudan-yojana-list-2022

50 हजार रूपये अनुदानासाठी याद्या आल्या, येथून डाऊनलोड करा | 50 Hajar Anudan Yojana List 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

50 Hajar Anudan Yojana List 2022 – शेतकरी मित्रांनो, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना शासनाने ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते, योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यासाठी दिनांक २९ जुलै २०२२ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.

या लेखात तुम्ही काय वाचाल?

50 Hajar Anudan Yojana List 2022

अखेर नियमित कर्जफेड करणार्‍या अशा शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे, कारण सर्व जिल्ह्यांच्या पात्र शेतकर्‍यांच्या याद्या गावनिहाय पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. तर ह्या याद्या कशा पाहाव्यात याची माहिती तुम्हाला ह्या लेखात मिळणार आहे.

50 Hajar Anudan Yojana List Download

सीएससी केंद्रावर हे पोर्टल कार्यान्वित असणार आहे आणि त्याच पोर्टलवर लाभार्थी याद्या प्रकाशित झाल्या आहेत. यादीत नाव असलेल्या पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे आणि लवकरच दिवाळीपूर्वीच पात्र लाभर्थ्यांना निधी वाटप केला जाणार आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याची लाभार्थी यादी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र/सीएससी केंद्रात पाहू शकणार आहात. सीएससी केंद्रावर जाऊन तुम्हाला यादीत तुमचे नाव आहे की नाही हे चेक करावे लागणार आहे.  50 Hajar Anudan Yojana List 2022

50 हजार रूपये अनुदानासाठी अशी असेल प्रक्रिया

मित्रांनो, सन २०१९ मध्ये ज्याप्रमाणे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०१९ राबविली गेली होती, त्याचप्रमाणे महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन लाभ योजना – २०१९ ही राबविली जाणार आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०१९ राबविली जात असताना आधी कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांची लाभार्थी यादी बँक आणि सीएससी केंद्राच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती. लाभार्थी यादीत पात्र शेतकर्‍यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला होता.

तसेच सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ हे पोर्टल विकसित करण्यात येऊन, त्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विशिष्ट क्रमांकाच्या सहाय्याने तसेच आधार क्रमांकाच्या साह्याने लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले होते. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम वर्ग करून कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता. आता अशाच पद्धतीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन लाभ योजना – २०१९ पार पडणार आहे. आणि (50 Hajar Anudan Yojana List 2022) यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला सीएससी केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.

ह्या पोस्ट मध्ये तुम्ही फक्त वाशीम जिल्ह्याची लाभार्थी यादी पाहू शकता, कारण प्रत्येक जिल्ह्यातील यादी फक्त त्याच जिल्ह्यातील सीएससी केंद्रात पाहायला मिळणार आहे.

50 Hajar Anudan Yojana List 2022

📢 वाशीम जिल्ह्यातील ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदानास पात्र शेतकर्‍यांची यादी पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉👉 50 Hajar Anudan List 2022

 

*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉  शेतकरी योजना ग्रुप

 

तर मित्रांनो, अशाप्रकारे ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी याद्या आलेल्या आहे. आता तुम्हाला सीएससी केंद्रात जाऊन तुमची आधार केवायसी करावी लागणार आहे आणि नंतर तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. तसेच इतर सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

 

 

 

1 thought on “50 हजार रूपये अनुदानासाठी याद्या आल्या, येथून डाऊनलोड करा | 50 Hajar Anudan Yojana List 2022”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top