50 Hajar Protsahan Anudan New GR: शेतकरी मित्रांनो, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जाची नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान वितरीत केले जात आहेत. आता या योजनेसाठी 1000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, त्याबाबतचा नवीन शासन निर्णय (50 Hajar Protsahan Anudan New GR) निर्गमित करण्यात आला आहे.
50 Hajar Protsahan Anudan New GR
मित्रांनो, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहानपर अनुदान योजनेस दिनांक 29 जुलै 2022 रोजी शासन मान्यता देण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणी करिता एकूण 4700 कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित करण्यात आला. त्यानंतर योजनेच्या लाभार्थी याद्या प्रसिद्ध करून लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करून प्रोत्साहन अनुदान शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येऊ लागले.
आतापर्यंत या योजनेच्या साधारणपणे 3 याद्या प्रसिद्ध झाल्या असून, लाभार्थ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान देखील जमा करण्यात आले आहे. तरी अजूनही बर्याच शेतकर्यांना हा निधी मिळालेला नाही. त्यामुळे आता या योजनेची आणखी एक लाभार्थी यादी येणार आहे, ती साधारणपणे 15 फेब्रुवारी नंतर प्रसिद्ध होऊ शकते. सोबतच या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
50 हजार रुपये अनुदानासाठी “हे” शेतकरी अपात्र, येथे क्लिक करून पहा
आतापर्यंत 4700 कोटी निधी वितरीत
मित्रांनो, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहानपर अनुदान योजनेसाठी एकूण 4700 कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित होता, त्यापैकी खालील प्रमाणे टप्पानिहाय निधी वितरीत करण्यात आला.
- दिनांक 16 सप्टेंबर 2022 च्या शासन निर्णयानुसार 2350 कोटी रुपये मंजूर
- दिनांक 18 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार 650 कोटी रुपये मंजूर
- दिनांक 17 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार 700 कोटी रुपये मंजूर
अशाप्रकारे एकूण 3700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. आता दिनांक 07 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा एकदा महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहानपर अनुदान योजनेसाठी एकूण 1000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय खालीलप्रमाणे आहे.
शासन निर्णय (50 Hajar Protsahan Anudan New GR)
सन 2022-23 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. 1000 कोटी (रु. एक हजार कोटी फक्त) इतकी रक्कम महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) (कार्यक्रम) अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
सविस्तर शासन निर्णय येथे पहा
या दिवशी येणार खात्यात
मित्रांनो, लाभार्थी यादीत नाव येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या किंवा प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत असणार्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय आणि दिलासादायक महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आधीच आपली KYC (आधार प्रमाणीकरण) केले असेल, त्यांच्या खात्यात साधारणपणे 12 फेब्रुवारी 2023 पासून हे अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल. तसेच ज्यांचे नाव पात्र असूनही यादीत आलेले नाही, अशा शेतकर्यांची शेवटची लाभार्थी यादी 15 फेब्रुवारी नंतर येण्याची शक्यता आहे.
तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे प्रोत्साहन अनुदान संदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण आज जाणून घेतले, इतर अपडेट जाणून घेण्यास उत्सुक असाल तर त्यासाठी तसेच इतर सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
सन 2022 च्या जिल्हानिहाय अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करा