50000 Protsahan Anudan Yojana 2nd List:- शेतकरी मित्रांनो, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना शासनाने ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते, योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यासाठी दिनांक २९ जुलै २०२२ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.
तर पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी १२ ऑक्टोबर २०२२ रोजी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती ती दुसर्या यादीची. अखेर दुसरी यादी आलेली आहे. 50000 Protsahan Anudan Yojana 2nd List
50000 Protsahan Anudan Yojana 2nd List
मित्रांनो, सन २०१९ मध्ये ज्याप्रमाणे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०१९ राबविली गेली होती, त्याचप्रमाणे महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन लाभ योजना – २०१९ ही राबविली जाणार आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०१९ राबविली जात असताना आधी कर्जमाफीस पात्र शेतकर्यांची लाभार्थी यादी बँक आणि सीएससी केंद्राच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती.
लाभार्थी यादीत पात्र शेतकर्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला होता. 50000 Protsahan Anudan Yojana 2nd List
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ हे पोर्टल विकसित करण्यात येऊन, त्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विशिष्ट क्रमांकाच्या सहाय्याने तसेच आधार क्रमांकाच्या साह्याने लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले होते.
आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम वर्ग करून कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता. आता अशाच पद्धतीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन लाभ योजना – २०१९ ही पार पडत आहे. पहिल्या यादीत नाव आलेल्या शेतकर्यांनी आधार केवायसी करून अनुदानाचे पैसे सुद्धा प्राप्त केले आहेत. आता (50 Hajar Anudan Yojana List 2022) दुसर्या यादीत जर तुमचे नाव असेल तर तुम्हाला सीएससी केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.
MJPSKY 50000 Protsahan Anudan Yojana Maharashtra 2nd List 2022
शेतकरी मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये तुम्ही फक्त काहीच जिल्ह्यांची दुसरी लाभार्थी यादी पाहू शकता, कारण प्रत्येक जिल्ह्यातील यादी फक्त त्याच जिल्ह्यातील सीएससी केंद्रात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील लाभार्थी यादी पहायची असेल तर त्यासाठी सीएससी सेंटरवर जाऊन पहावे लागेल, किंवा आपल्या वेबसाईटवर लवकरच आपण इतर जिल्ह्यांच्या याद्या टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
50 Hajar Anudan Yojana List 2022 –
📢 वाशीम जिल्ह्यातील ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदानास पात्र शेतकर्यांची दुसरी यादी पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉👉 Washim District 50 Hajar Anudan List 2022
(मित्रांनो, ह्या यादीत अद्याप काहीच गावांचा समावेश आहे, लवकरच याद्या अपडेट केल्या जातील.)
📢 पुणे जिल्ह्यातील ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदानास पात्र शेतकर्यांची दुसरी यादी पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉👉 Pune District 50 Hajar Anudan List 2022
तर मित्रांनो, अशाप्रकारे ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी याद्या आलेल्या आहे. आता तुम्हाला सीएससी केंद्रात जाऊन तुमची आधार केवायसी करावी लागणार आहे आणि नंतर तुमच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे. तसेच इतर सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप