Kharip Paisewari 2022 – शेतकरी मित्रांनो, सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी आता जाहीर करणे सुरू झाले आहे. सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची वाशिम जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ५४ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. तर आजच्या ह्या लेखात आपण वाशिम जिल्ह्याची तालुकानिहाय हंगामी पैसेवारी सरासरी जाणून घेणार आहोत.
Kharip Paisewari 2022
मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात एकूण ७९३ महसूल गावे आहेत. यातील १४८ गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आहे. तर ६४५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा जास्त आढळून आली आहे.
वाशिम जिल्ह्याचा तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे
- वाशिम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे आहेत. या सर्व १३१ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे.
- मालेगाव तालुक्यातील १२२ गावांपैकी १०८ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आणि १४ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे.
- रिसोड तालुक्यात १०० महसूली गावे असून त्यापैकी ४० गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आणि ६० गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
- मंगरुळपीर तालुक्यात १३७ महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
- कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
- मानोरा तालुक्यात १३६ गावे आहे. या सर्व १३६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.
तर मित्रांनो अशाप्रकारे एकूण वाशिम जिल्ह्यातील खरीप हंगामातील हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे इतकी आढळून आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.