Kantrati Bharti GR

Kantrati Bharti GR 2023 : राज्यात आता कंत्राटी पदभरती होणार, कंत्राटी भरतीचा GR आला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kantrati Bharti GR: प्रशासनावरील होणारा खर्च आटोक्यात ठेवून विकासाच्या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शक्य असेल तिथे कंत्राटी पद्धतीने कामे करून घेण्याचे शासनाचे धोरण असून, त्यासाठीच अखेर कंत्राटी भरतीचा शासन निर्णय (Kantrati Bharti GR) काढण्यात आला आहे.

सरकारी भरतीला पर्याय म्हणून ही कंत्राटी भरती केली जाणार आहे. यासाठी 9 खाजगी कंपन्यांना कंत्राट दिले जाणार आहेत. तब्बल 138 संवर्गातील हजारो पदे ही कंत्राटी पद्धतीने भरली जातील.

कंत्राटी पदभरती मध्ये कोणतेही आरक्षण नसणार आहे, त्यामुळे आता सर्वांना शासकीय नोकरीत कंत्राटी पद्धतीने कंत्राटी नोकरी मिळवता येणार आहे.

या लेखात तुम्ही काय वाचाल?

Kantrati Bharti GR

दिनांक 06 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाद्वारे बाह्य यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवापुरवठादार संस्थेचे / एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी शासन मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

👇👇👇

🛑 कंत्राटी भरतीचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 🛑

 

कंत्राटी भरतीसाठी “या” असतील कंपन्या

कंत्राटी भरतीसाठी एकूण 9 खाजगी कंपन्यांची (Kantrati Bharti Companies) नियुक्ती करण्यात आली असून, त्या खालीलप्रमाणे असतील.

  1. अॅक्सेंट टेक सर्व्हिसेस लि. (Aksentt Tech Services Limited)
  2. सी.एम.एस. आयटी सर्व्हिसेस प्रा.लि. (CMS IT Services Pvt. Ltd. Consortium Member: AJ Trading Co.)
  3. सी.एस.सी. ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. (CSC e-Governance Services India Limited)
  4. इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि. (Innowave IT Infrastructure Limited)
  5. क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. (Krystal Integrated Services Pvt. Ltd.)
  6. एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल लि. (S2 Infotech International Limited)
  7. सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि. (Sainik Intelligence Security Private Limited Consortium Member : Sutishka India Security Pvt. Ltd.)
  8. सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि. (Singh Intelligence Security Pvt. Ltd. Consortium Member : Wellconnect Facilities Pvt. Ltd.)
  9. उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा.लि. (Urmila International Services Pvt. Ltd. Consortium Member: Success Facilities Services Private Limited.)

उपरोक्त सर्व सेवापुरवठादारांच्या / कंपन्यांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग / निमशासकीय विभाग / स्थानिक स्वराज्य संस्था / महामंडळे / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम / इतर आस्थापना इ. यांना बंधनकारक करण्यात आले आहे. म्हणजेच जेव्हा सरकारी नोकर भरती करण्यात येईल तेव्हा वरील 9 कंपन्यांना त्यात प्राधान्य दिले जाईल.

Kantrati Bharti GR Salary

बाह्य यंत्रणेकडून राबविण्यात येणार्‍या या कंत्राटी भरती मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर, इंजिनीयर अशा पदांसोबतच परिचर पदांची सुद्धा कंत्राटी भरती करण्यात येईल. या सर्व पदांची शैक्षणिक अर्हता व त्यांना मिळणारा एकूण पगार किती असेल? याबाबत कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयासोबत {Kantrati Bharti GR} परिपत्रक जोडून माहिती देण्यात आली आहे. याबाबत सर्व सविस्तर माहिती तुम्ही खालील पीडीएफ मध्ये पाहू शकता.

👇👇👇

👷 कंत्राटी भरतीमध्ये असणारी एकूण पदे आणि त्यांना मिळणारा एकूण पगार किती? येथे क्लिक करून पहा

तर मित्रांनो, अशाप्रकारे ह्या कंत्राटी भरती संदर्भात सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेतली आहे. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी ह्याबाबतचा शासन निर्णय डाऊनलोड करून नक्की पहावा.

अशाच प्रकारच्या माहिती आणि अपडेट्स करिता आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला भेट देत रहा.  

🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group

_________________________________________________

📢 नमो शेतकरी सन्मान निधी योजना | Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023

📢 ZP Recruitment 2023 : जिल्हा परिषद मेगा भरती, पहा सविस्तर माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top