Namo Shetkari Yojana 1st Installment

Namo Shetkari Yojana 1st Installment : अखेर नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपये मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Yojana 1st Installment: शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता (Namo Shetkari Yojana 1st Installment) कधी मिळणार? याची प्रतिक्षा राज्यातील तमाम शेतकर्‍यांना होती.

अखेर नमो शेतकरी योजनेच्या पहिला हप्ता वितरणाची शासनाने तयारी केली आहे. पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.

याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

👇👇👇

🏠 कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा, राज्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम जमा करणार

Namo Shetkari Yojana 1st Installment

सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना घोषित करण्यात आली होती.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देण्यात येणा-या प्रति वर्ष, प्रति शेतकरी रु.6000.00 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी रु.6000.00 इतक्या निधीची भर घालणारी ” नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

👇👇👇

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा GR येथे पहा, अशी असेल योजनेची पात्रता आणि कार्यपद्धती

तसेच सदर योजने अंतर्गत लाभार्थीना लाभ अदा करणेसाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणा-या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण दोन स्वतंत्र बचत खाती, आयुक्त (कृषि) यांचे नावे “बँक ऑफ महाराष्ट्र” या राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे.

आयुक्त (कृषि), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी (माहे एप्रिल ते जुलै) रु. 1720 कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

👇👇👇

नमो शेतकरी सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती येथे पहा

शासन निर्णय

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी एकूण रु. 1720 कोटी मंजूर, सविस्तर शासन निर्णय पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

__________________________________________________________________

नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि शासनाच्या इतर सर्व योजनांचे सर्व अधिकृत अपडेट्स तुम्हाला आपल्या वेबसाईट वर मिळत राहतील, त्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला भेट देत रहा.  

🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top