“या” जिल्ह्यात दिवाळी आधी मिळणार पीक विमा | Pik Vima 2020

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima 2020 –  शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की खरीप हंगाम २०२० मध्ये पीक विमा योजनेत झालेल्या कंपनीच्या मनमानी कारभाराविरुद्ध उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्यात खरीप २०२० चा पीक विमा मिळवा म्हणून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा ऐतिहासिक असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप २०२० चा पीक विमा वितरीत करण्याचे आदेश मागे देण्यात आले. मा.उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत मा.सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी बांधवांना न्याय दिला आणि विमा कंपनीने सर्वोच्च न्यायालयाकडे जमा केलेले रुपये २०० कोटी, त्यावर जमा झालेले व्याज तसेच शेतकऱ्यांना देय असलेली उर्वरित रक्कम ही विमा कंपनीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. आता खरीप – २०२० पिक विमा वितरित करण्यासाठी आवश्यक स्वीय्य प्रपंजी लेखा खाते (पीएलए अकाउंट ) उघडण्यास परवानगी देण्याचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.

Osmanabad Pik Vima 2020

खरीप २०२० पिक विमा बाबतचा उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने ३ आठवड्यात म्हणजेच २७/०९/२०२२ पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्याचा अभूतपूर्व निर्णय दिला होता.

यासाठी जिल्हाधिकारी व विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ३ आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत असे निर्देश देण्याची सूचना कृषी आयुक्त श्री.धीरज कुमार यांना दिली होती.

 

Pik Vima 2020 Update

खरीप-२०२० हंगामामध्ये सोयाबीन पिकाचा विमा भरलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार असून मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांनी बजाज अलियान्झ कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांना दिले आहेत.

विमा कंपनीने जवळपास ७९,००० शेतकऱ्यांना खरीप-२०२० चा विमा यापूर्वी वितरित केला असून पिक विमा देताना कंपनीने नुकसानीची टक्केवारी नमूद केलेली आहे. त्यानुसार जास्तीत जास्त नुकसानीची टक्केवारी गृहीत धरून त्याप्रमाणे नुकसान भरपाई निश्चित करावी. विमा भरलेला एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी संबंधितांना दिली आहे. Pik Vima 2020

 

Pik Vima Yojana Maharashtra

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पिक विम्याची रक्कम जिल्हा प्रशासनामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात येणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचा हप्ता, केंद्र व राज्य सरकारचा हप्ता विमा कंपनीकडे जमा करण्यात येत होता व नुकसानीची भरपाई पिक विमा कंपनीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत होती. परंतु मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली पिक विमा वितरित करण्यात येत आहे.

सदरील रक्कम वितरित करण्याची ही पद्धत नवीनच असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्यावर मात करत नवीन खाते उघडण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय झाला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांच्या नावाने प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत खरीप-२०२० विमा रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी सदरील खाते उघडण्यास परवानगी देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Pik Vima 2020 List

मा.उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाविरोधात विमा कंपनीने मा.सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर मा.सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीस २०० कोटी रुपये जमा करण्याच्या अटीस अधिन राहून मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयास स्थगिती दिली होती. सदर याचिकेच्या सुनावणी अंती यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार न्यायालयाच्या कोषागारामध्ये जमा असलेली रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम कोषागार कार्यालय, धाराशिव येथे जमा करणे बाबत व त्यांचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली करणेबाबत आदेशित केले होते.

परंतु सदरील रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयाकडे जमा करून घेण्यासाठी संयुक्तिक खाते नसल्यामुळे स्वीय प्रपंजी लेखा खाते उघडण्यास मान्यता देण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक यांच्या नावाने खाते उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

Osmanabad Pik Vima 2020
आता खाते नंबर घेण्याची प्रक्रिया केली जाईल व खाते नंबर रजिस्ट्रार यांना कळवून मा.सर्वोच्च न्यायालयात जमा असलेले २०० कोटी रुपये व त्यावरील व्याज या नवीन खात्यावर वर्ग करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारकडे शिल्लक असलेले २२० कोटी रुपयांचा विमा कंपनीला देय असलेला हप्ता देखील उर्वरित आवश्यक निधीसाठी याच खात्यावर वर्ग करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

शेतकऱ्यांना अदा करावयाच्या नुकसान भरपाईच्या याद्या तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून २ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हक्काच्या नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

Pik Vima 2020 GR

मित्रांनो, खरीप – २०२० पिक विमा वितरित करण्यासाठी आवश्यक स्वीय्य प्रपंजी लेखा खाते (पीएलए अकाउंट ) उघडण्यास परवानगी देण्याचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे. तो शासन निर्णय तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून वाचू शकता. 

 

📃 सविस्तर शासन निर्णय वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा  👉👉 शासन निर्णय

ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top