Namo Shetkari Yojana Status: शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता नुकताच 26 ऑक्टोबर 2023 पासून शेतकर्यांना वितरीत करण्यात आला आहे.
परंतू बर्याच शेतकरी बांधवांना अजूनही हा पहिला हप्ता मिळालेला नाही, तर त्यांनी आपले नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स (Namo Shetkari Yojana Status) कसे चेक करावे? याची माहिती आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
Namo Shetkari Yojana Status
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात.
त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Yojana)’ सुरू केली आहे. ह्यायोजनेचा शुभारंभ दिनांक 26 ऑक्टोबर 2023 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला आहे.
👇👇👇
राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये सन्मान निधी म्हणून मिळतील. तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वितरीत झाल्यानंतर या योजनेचे स्टेट्स कसे पहायचे? हा प्रश्न अनेक शेतकर्यांना पडला होता.
अखेर नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स (Namo Shetkari Yojana Status) चेक करण्यासाठी राज्य सरकारकडून नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स कसे चेक करायचे? हे आपण थोडक्यात पाहुयात.
असे चेक करा Namo Shetkari Yojana Status
मित्रांनो, राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचे स्टेटस पाहण्यासाठी आता https://nsmny.mahait.org/ हे नवीन पोर्टल कार्यान्वित केले आहे. तुमचे स्टेट्स पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Google Chrome हे ब्राउझर सुरू करा.
- त्यानंतर अॅड्रेस बार मध्ये https://nsmny.mahait.org/ ही लिंक टाकून ती ओपन करून घ्या.
- नवीन पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला Login आणि Beneficiary Status असे दोन पर्याय दिसतील.
- त्यापैकी Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे.
- आता Beneficiary Status चेक करण्यासाठी तुम्हाला तुमचा PM Kisan योजनेसाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक/आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि तुमचा PM Kisan Registration Number माहीत असणे आवश्यक आहे.
- Beneficiary Status चेक करण्यासाठी तुम्ही तुमचा PM Kisan योजनेसाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक/आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि तुमचा PM Kisan Registration Number टाकून Get Data या बटणावर क्लिक करावे.
- Get Data या बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे नमो शेतकरी योजनेचे स्टेट्स (Namo Shetkari Yojana Status) पाहता येईल.
👇👇👇
येथे क्लिक करून तुमचे नमो शेतकरी स्टेट्स पहा
अधिक माहितीसाठी खालील विडिओ नक्की पहा.