Ativrushti Nuksan Bharpai 2022

झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश | Shetkari Nuksan Bharpai 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetkari Nuksan Bharpai 2022 – मित्रांनो, यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच सगळीकडे पावसाचा जोर पाहायला मिळाला. जून ते अगदी सप्टेंबरपर्यंत आणि आता ऑक्टोबरच्या सुरूवातीला सुद्धा पावसाने सगळीकडे कहर केला आहे. हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टी मदत कधी मिळते? नेमके हेच शेतकरी बांधवांना कळेनासे झाले आहे.

Shetkari Nuksan Bharpai 2022

अशातच बुलढाणा जिल्ह्यात दिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वदूर पाऊस झाला असून या पावसामुळे मेहकर, नायगाव, लोणार, या भागाला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला. त्यामुळे या भागात झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने तात्काळ करावेत. यापासून एकही शेतकरी आणि त्याचे क्षेत्र वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. Shetkari Nuksan Bharpai 2022

Ativrushti Nuksan Bharpai 2022

सोमवारी (दिनांक 10) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मेहकर मंडळात 107 मि.मी. आणि नायगांव मंडळात 107 मि.मी. तर लोणार तालुक्यातील सुलतानपूर मंडळात 105 मि.मी. पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे ह्या दोन तालुक्यात अंदाजे 19 हजार 65 हेक्टर शेतीपीकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच पालकमंत्री श्री. पाटील हयांनी जिल्हाधिकारी यांचेकडून सविस्तर माहिती घेतली. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. सदर पंचनामे करतांना नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत गावपातळीवरील यंत्रणेला निर्देश द्यावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर हेही मंत्री महोदयांसमवेत उपस्थित होते.
सद्यस्थितीत मेहकर आणि लोणार तालुक्यातील शेती पीकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरु करण्यात आले असून दहा ते बारा दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येऊन जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनास अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

संपूर्ण राज्यासाठी दिनांक ०८ सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार एकूण २७ लाख ६५ हजार ७२७ शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ४४५ कोटी २५ लाख रुपयांची अतिवृष्टी मदत मिळणार आहे.

याशिवाय दुसर्‍या टप्प्यात सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून ३३५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत, ते तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून सविस्तरपणे जाणून घेऊ शकता. 👉👉 Ativrushti Nuksan Bharpai 2022 | दुसर्‍या टप्प्यात ३३५ कोटींची नुकसान भरपाई मंजूर

 

ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top