22 January 2024 holiday in Maharashtra: श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य सरकारने सोमवार, दि. 22 जानेवारी 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतची अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केली आहे.
22 January 2024 holiday in Maharashtra
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या औपचारिक विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रारंभी, अशा कार्यक्रमांसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाऊ शकत नाही कारण याला प्राधान्य नाही, असे सांगून सामान्य प्रशासनाने विनंतीला विरोध केला, मात्र नंतर हे निवेदन मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात सादर करण्यात आले.
अखेर मंत्री मंगल प्रभात लोढा यांची मागणी मान्य करून महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त सुट्टी जाहीर केली आहे.
Ayodhya Ram Mandir Opening
अयोध्या राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा 22 जानेवारी रोजी भव्यतेने होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.