ativrushti nuksan bharpai 2022

Shetkari Nuksan Bharpai 2022 | “या” ९ जिल्ह्यांना ७५५ कोटी रुपये वितरीत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shetkari Nuksan Bharpai 2022 – शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ मध्ये राज्यभरात अतिवृष्टी, पुरस्थिती, किडींचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर केली होती, परंतु निकषात बसत नसल्याने अनेक शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागणार होते. पण आता अशा निकषात न बसणार्‍या शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ९ जिल्हयांसाठी ७५५ कोटींचा निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.

Ativrushti Nuksan Bharpai 2022

अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाब म्हणून सुमारे ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. आणि काल दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याचा राज्यातील अंदाजे ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो शासन निर्णयाचा सविस्तर आढावा आणि जिल्हानिहाय मदत आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

Ativrushti Nuksan Bharpai List 2022

मित्रांनो, राज्यात जून ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत विविध जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे व उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता/शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांचे नुकसान व शेतजमिनीचे नुकसान याकरिता मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण रु.३५०१.७१ कोटी, रु.९८.५८ कोटी व रुपये ३३५.१७ कोटी इतका निधी वर नमूद अनुक्रमे दि.८.९.२०२२, दि. १४.९.२०२२ व दि. २८.०९.२०२२ च्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळ उपसमितीने चालू हंगामाकरिता अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून विहित दराने मदत देण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
म्हणूनच दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय घेण्यात आला आहे. तर तो शासन निर्णय सविस्तरपणे वाचण्यासाठी आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर करण्यात आला आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. 👉👉 शासन निर्णय

शासन निर्णयः

जून ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून वर अ. क्र. २ येथे नमूद शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.७५५६९.४३लक्ष (अक्षरी रुपये सातशे पंच्चावन्न कोटी एकोणसत्तर लक्ष त्रेचाळीस हजार फक्त) इतका निधी सोबत जोडलेल्या प्रपत्रात जिल्हा निहाय दर्शविल्याप्रमाणे संबंधित विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्ह्यांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

जिल्हानिहाय निधी खालील प्रमाणे
१) औरंगाबाद – एकूण शेतकरी – १६४१०
एकूण मंजूर निधी – १७ कोटी ५० लाख
२) जालना – एकूण शेतकरी – ११५०
एकूण मंजूर निधी – ९७ लाख
३) परभणी – एकूण शेतकरी – ४४८६
एकूण मंजूर निधी – ३ कोटी ४६ लाख
४) हिंगोली – एकूण शेतकरी – १३४४०६
एकूण मंजूर निधी – १३२ कोटी १४ लाख
५) बीड – एकूण शेतकरी – १६०
एकूण मंजूर मदत – १७ लाख
६) लातूर – एकूण शेतकरी – ३४२०७१
एकूण मंजूर निधी – २९० कोटी २ लाख
७) उस्मानाबाद – एकूण शेतकरी – १४६३१०
एकूण मंजूर निधी – १५३ कोटी २५ लाख
८) यवतमाळ – एकूण शेतकरी – ६९५२७
एकूण मंजूर निधी – ५१ कोटी १३ लाख
९) सोलापूर – एकूण शेतकरी – ११३८६४
एकूण मंजूर निधी – १०७ कोटी २ लाख

 

संपूर्ण राज्यासाठी दिनांक ०८ सप्टेंबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार एकूण २७ लाख ६५ हजार ७२७ शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ४४५ कोटी २५ लाख रुपयांची अतिवृष्टी मदत मिळणार आहे.

याशिवाय दुसर्‍या टप्प्यात सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून ३३५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत, ते तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून सविस्तरपणे जाणून घेऊ शकता. 👉👉 Ativrushti Nuksan Bharpai 2022 | दुसर्‍या टप्प्यात ३३५ कोटींची नुकसान भरपाई मंजूर

ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉  शेतकरी योजना ग्रुप

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top