Namo Shetkari Yojana 2nd Installment: केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा राज्यातील शेतकर्यांसाठी “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” सुरू केली आहे. या योजनेचा पहिला हप्ता ऑक्टोबर 2023 मध्ये वितरीत करण्यात आला आहे.
तर राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेच्या दुसर्या हप्त्याची (Namo Shetkari Yojana 2nd Installment) प्रतीक्षा लागलेली आहे. परंतू त्याआधी या योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. नेमके ते अपडेट काय आहे? हे आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.
Namo Shetkari Yojana 2nd Installment
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण आवश्यक असून त्याअनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.
या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रमाणिकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र (CSC), पी.एम.किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे.
“याच” शेतकर्यांना मिळेल नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता
पी. एम. किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करण्यात येणार आहे. (संदर्भ येथे पहा)
अपात्र व वंचित शेतकर्यांनी विशेष मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधिन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
म्हणजेच ज्या शेतकर्यांना पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळेल, त्याच शेतकर्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील विडिओ नक्की पहा.