Dhan Bonus 2024: राज्यातील धान उत्पादक शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी असून, राज्य सरकारने धान उत्पादक शेतकर्यांना प्रति हेक्टरी 20 हजार रुपये धान बोनस म्हणजेच प्रोत्साहनपर अनुदान (Dhan Bonus 2024) जाहीर केले आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम सन 2023-24 मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त, नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी 20 हजार रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे.
हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात येणार असल्याबाबतचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने निर्गमित केला आहे. ह्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती आजच्या ह्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.
Dhan Bonus 2024
दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी ह्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार हे अतिरिक्त प्रोत्साहनपर अनुदान फक्त पणन हंगाम सन 2023-24 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागू राहील.
खरीप पणन हंगाम सन 2023-24 मधील किमान आधारभूत किंमतीवर प्रोत्साहनपर अनुदान द्यायचे असल्याने पणन हंगाम सन 2023-24 साठी धान, भरडधान्य खरेदीबाबतच्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी सर्व अटी व शर्तीनुसारच नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी.
मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू, ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये मिळणार
त्यानुसार कोणते शेतकरी ह्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र असतील ते आपण थोडक्यात पाहुयात, परंतू त्याआधी शासन निर्णय काय आहे ते पहा.
शासन निर्णय
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत, खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये, केंद्र शासनाने मंजूर केलेल्या हमीभावाव्यतिरिक्त, योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी रू. 20,000/- याप्रमाणे (दोन हेक्टरच्या मर्यादेत ) प्रोत्साहनपर राशी अदा करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
सदर रक्कम धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावी.
👉📃सविस्तर शासन निर्णय येथे पहा
फक्त “याच” शेतकर्यांना मिळणार धान बोनस
वरील अतिरिक्त प्रोत्साहनपर राशी केवळ पणन हंगाम 2023-24 मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांकरिताच लागू राहील.
खरीप पणन हंगाम 2023-24 मधील किमान आधारभूत किंमतीवर प्रोत्साहनपर राशी द्यावयाची असल्याने, पणन हंगाम 2023-24 साठी धान / भरडधान्य खरेदीबाबतच्या संदर्भाधिन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीनुसारच शेतकरी नोंदणी झाली असल्याची दक्षता घ्यावी.
- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे – खातर जमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील.
- शेतकऱ्यांना (धान विक्री केली असो वा नसो) धान उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी रू.20000/- प्रमाणे प्रोत्साहनपर राशी केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच वाटप करण्यात यावी.
- धान उत्पादक शेतकरी हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरु केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रांवर नोंदणीकृत असला पाहीजे.
- प्रोत्साहनपर राशीस पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही.
- शेतकऱ्याने सादर केलेला 7/12 चा उतारा त्यावरील धान लागवडीखालील जमीनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोत्साहनपर राशीची रक्कम निश्चित करण्यात यावी. यासाठी महसूल विभागाने विकसित केलेल्या ई-पीक पाहणी अॅपद्वारे संकलित केलेल्या माहितीचा आधार घेण्यात यावा.
अशी असेल कार्यपद्धती
- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोदंणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई-पीक पहाणीद्वारे खातरजमा करून जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभ अनुज्ञेय राहील.
- शेतकऱ्यांना (धान विक्री केली असो वा नसो) धान उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी 20 हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे.
- धान उत्पादक हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असावा.
- प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना विक्री करणे बंधनकारक नाही.
- ई-पीक पहाणी ॲपद्वारे संकलीत माहितीच्या आधारे सात बारा उताऱ्यावरील धान लागवडीच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार प्रोस्ताहनपर अनुदान निश्चित करण्यात येईल.
- एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) त्यास प्रोत्साहनपर अनुदान देय राहील.
तर मित्रांनो, अशाप्रकारे धान उत्पादक शेतकर्यांना हेक्टरी 20 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. यासंदर्भात पुढे काही अपडेट आल्यास, नक्कीच तुमच्यापर्यंत पोहचविले जाईल.