Pik Vima 2022 :- शेतकरी मित्रांनो, राज्यात परतीच्या पावसाने राज्यातील शेतीपिकांची दयनीय अवस्था केलेली असताना पीक विमा कंपन्यांनी मात्र पीक विमाधारक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेत पूर्वसूचना दिलेल्या दहा लाख शेतकऱ्यांना कंपन्यांनी अद्यापही नुकसान भरपाई दिलेली नाही. खरीप २०२२ करिता ८३३ कोटीचा पीक विमा दिवाळीपूर्वी जमा होण्यासाठी कृषी विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.
Kharip Pik Vima 2022
गारपीट, अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, शेतात पाणी साठणे, ढगफुटी, वीज कोसळून आग लागणे अशा कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याला ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती’ समजली जाते. नुकसान होताच ७२ तासांच्या आत शेतकऱ्याने संबंधित पीक विमा कंपनीला कळविणे म्हणजेच पीक नुकसानीची पूर्वसूचना (इंटिमेशन) देणे बंधनकारक आहे. यानंतर मात्र कंपनीला शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून वैयक्तिक पंचनामे करावे लागतात. राज्यात परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने पीक विमाधारक शेतकऱ्यांकडून लाखो पूर्वसूचना मिळाल्यानंतरही कंपन्या मात्र तातडीने कार्यवाही करताना दिसत नाही आहे.
९ जिल्ह्यांना मिळणार ७५५ कोटी रुपये, तुम्हाला किती मिळणार? येथे क्लिक करा
Pik Vima Yojana Maharashtra
राज्यात यंदा खरीप पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ४१.६३ लाख पूर्वसूचना दिलेल्या आहेत. त्यापैकी ३०.५६ लाख प्रकरणांमध्ये कंपन्यांनी सर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र भरपाई दिलेली नाही. ११.०७ लाख पूर्वसूचनांचे सर्वेक्षण अद्यापही झालेले नाही. कृषी विभागाकडून विविध जिल्ह्यांमधील रखडलेल्या कामांचा आढावा घेतला जात आहे. मात्र कंपन्यांची दिरंगाई कायम आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तींबाबत साडेदहा लाख शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी ८३६ कोटीची भरपाई देणे अपेक्षित आहे. त्यासाठी अत्यावश्यक असलेली प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ४९७४ शेतकऱ्यांना २.६३ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आलेली आहे.
स्थानिक नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त ‘मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती’ अशी एक वेगळी तरतूददेखील भरपाई देण्यासाठी वापरली जाते. पावसाचा खंड, कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रादुर्भाव, सतत पाऊस यापैकी कोणत्याही कारणामुळे पिकाच्या उत्पादनात ५० टक्क्यापेक्षा जास्त घट आल्यास भरपाई दिली जाते. अर्थात, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आधी अधिसूचना काढली तरच विमा कंपन्यांकडून भरपाईची प्रक्रिया सुरू केली जाते. आतापर्यंत १५ जिल्ह्यांमध्ये अधिसूचना काढल्या आहेत. यातील जालना, गोंदिया, कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील १.४९ लाख शेतकऱ्यांना ४७.४१ कोटीची नुकसान भरपाईदेखील देण्यात आलेली आहे. १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीच्या तरतुदींमधून शेतकऱ्यांच्या दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी, यासाठी विमा कंपन्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
Pik Vima दिवाळीपूर्वी भरपाई जमा होण्यासाठी पाठपुरावा
स्थानिक नैसर्गिक आपत्तीबाबत राज्यातून आतापर्यंत ३०.५६ लाख पूर्वसूचना आलेल्या आहेत. त्यातील जवळपास १०.५९ लाख पूर्वसूचनांची नुकसान भरपाई निश्चित झाली आहे. ही रक्कम ८३६ कोटी रुपयांच्या आसपास येते. शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित ८३३ कोटीची मदत भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी जमा होण्यासाठी कृषी विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.
ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप