50 Hajar Anunda Yojana

50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदानासाठी “येथे” याद्या पाहता येणार, अशी असेल संपूर्ण प्रक्रिया | 50 Hajar Anudan Yojana List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

50 Hajar Anudan Yojana List – शेतकरी मित्रांनो, कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना शासनाने ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते, योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यासाठी दिनांक २९ जुलै २०२२ रोजी त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.

अखेर नियमित कर्जफेड करणार्‍या अशा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण ही सर्व प्रक्रिया ज्या वेबसाईटच्या माध्यमातून राबविली जाणार आहे ती अखेर सुरू झाली आहे. सीएससी केंद्रावर हे पोर्टल कार्यान्वित असणार आहे आणि त्याच पोर्टलवर लाभार्थी याद्या प्रकाशित होणार आहेत. यादीत नाव असलेल्या पात्र लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे आणि लवकरच पात्र लाभर्थ्यांना निधी वाटप केला जाणार आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याची लाभार्थी यादी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र/सीएससी केंद्रात पाहू शकणार आहात.

 

  • योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय 👉👉 येथे क्लिक करा

 

अशी राबविली जाणार संपूर्ण प्रक्रिया

मित्रांनो, सन २०१९ मध्ये ज्याप्रमाणे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०१९ राबविली गेली होती, त्याचप्रमाणे महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन लाभ योजना – २०१९ ही राबविली जाणार आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०१९ राबविली जात असताना आधी कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांची लाभार्थी यादी बँक आणि सीएससी केंद्राच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली होती. लाभार्थी यादीत पात्र शेतकर्‍यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला होता. तसेच सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी https://mjpskyportal.maharashtra.gov.in/ हे पोर्टल विकसित करण्यात येऊन, त्या पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या विशिष्ट क्रमांकाच्या सहाय्याने तसेच आधार क्रमांकाच्या साह्याने लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले होते. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम वर्ग करून कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता. आता अशाच पद्धतीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन लाभ योजना – २०१९ पार पडणार आहे.

अनुदानासाठी पात्र शेतकर्‍यांना काय करावे लागणार?

शेतकरी मित्रांनो, ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानास जर तुम्ही पात्र असाल तर सर्वप्रथम तुम्हाला याद्या प्रकाशित झाल्यानंतर जवळच्या/नजीकच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन यादीत तुमचे नाव आहे की नाही याची खात्री करावी लागणार आहे. यादीत तुमच्या नावाची खात्री झाल्यानंतर तुम्हाला सीएससी (CSC) केंद्रावर विशिष्ट क्रमांक किंवा आधार क्रमांकाच्या साहाय्याने अंगठा लावून तुमचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे लागणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर तुमच्या खात्यात प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

 

५० हजार रुपये अनुदानासाठी कोण असणार पात्र जाणून घ्या?

नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात येणार आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३० जून, २०१८ पर्यंत पुर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन २०१८-१९ या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३० जून, २०१९ पर्यंत पुर्णत: परतफेड केलेले असल्यास, सन २०१९-२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास अथवा सन २०१७-१८. २०१८-१९ व २०१९-२० या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनूसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पुर्णत: परतफेड (मुद्दल + व्याज) केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर
रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात घेतलेल्या व त्याची पुर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रु. ५० हजारापेक्षा कमी असल्यास, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन २०१८-१९ अथवा सन २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रक्कमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

“ह्या” शेतकर्‍यांना मिळणार नाही लाभ, जाणून घ्या कोण असतील अपात्र?

१) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
२) महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य. आजी/ माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य.
३) केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/ कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
४) राज्य सार्वजनिक उपक्रम (उदा. महावितरण. एस टी महामंडळ इ.) व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून)
५) शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती.
६) निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन रुपये २५००० पेक्षा जास्त आहे (माजी सैनिक वगळून).
७) कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये २५००० पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी (अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ)

तर मित्रांनो, अशाप्रकारे ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी पोर्टल सुरू झालेले आहे. योजनेची संपूर्ण प्रक्रिया कशी असेल हे सुद्धा आपण जाणून घेतले आहे. तसेच इतर सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top