Top Harbhara Variety:- मित्रांनो, रब्बी हंगाम म्हटला की दिवसेंदिवस शेतकर्यांचा जास्तीत जास्त कल हा हरभरा पिकाकडे (Harbhara Lagwad) वाढत चालला आहे.
कडधान्य पिके ही बहुतांशी खरीप हंगामामध्ये पावसाच्या पाण्यावर घेतली जातात. मात्र हरभरा हे कडधान्य पीक असूनही रब्बी हंगामामध्ये घेतले जाते.
रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. Top Harbhara Variety
Top Harbhara Variety
मित्रांनो, हरभरा या पिकाला सर्वात कमी पाण्याची गरज असते आणि कमीत कमी उत्पादन खर्चात हे पीक घेता येते.
पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करून पीक उत्पादन तंत्रज्ञानाची जोड देऊन सुधारीत वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहू क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते.
परतीच्या पावसाने उशीर झालेला रब्बी हंगाम आता सुरू झालेला आहे, त्यामुळे हरभरा पीक घेत असताना नेमके कोणते वाण निवडावे? हा प्रश्नही अनेक शेतकरी बांधवांना पडलेला असणार, यात शंका नाही.
हरभरा पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल, तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणार्या आणि रोगप्रतिकारक्षम सुधारीत वाणांचा वापर करणे महत्त्वाचे ठरते.
म्हणूनच शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण हरभरा पिकांच्या टॉप १० सुधारीत वाणांबद्दल (Top Harbhara Variety) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Top Harbhara Variety in Maharashtra
देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विक्रांत हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत आणि काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पी.के.व्ही – २ (काक-२) पीकेव्ही -४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत.
यापैकी विजय, दिग्विजय आणि फुले विक्रम हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात.
या शिवाय फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे. विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे.
फुले विक्रम हा नविन वाण यांत्रीक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारीत केला आहे.
Top 10 Harbhara Variety (टॉप १० हरभरा वाण)
१) हरभरा – विजय
प्रसारीत वर्ष – सन १९९३
विद्यापीठ – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी द्वारे प्रसारीत
जमीन – मध्यम ते भारी काळी, ४५ ते ६० सें. मी. खोली
हवामान – तापमान – किमान १०-१५ अंश से. कमाल २५-३० अंश से.
पेरणीचा कालावधी – जिरायती – २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर, बागायती – २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर
प्रति एकर बियाणे – ३५ ते ४० किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – १०५ ते ११० दिवस
उत्पादकता – जिरायती – सरासरी १४ क्विं./हे., बागायत – सरासरी २३ क्विं./हे.
वैशिष्टे/गुणधर्म – मर रोग प्रतिकारक्षम,अधिक उत्पादनक्षमता, अवर्षण प्रतिकारक्षम
जिरायत, बागायत तसेच उशीरा पेरणीस योग्य,
महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्याकरिता प्रसारित
२) हरभरा – विशाल
प्रसारीत वर्ष – सन १९९५ साली प्रसारीत
संशोधन केंद्राचे नांव – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
जमीन – मध्यम ते भारी काळी, ४५-६० सें.मी.खोली असलेली जमीन
हवामान – तापमान किमान १०-१५° से, कमाल २५-३०° से, पाऊसमान : ७५०-१००० मिमी
पेरणीचा कालावधी – जिरायती – २० सप्टें. ते १० ऑक्टो., बागायत : २० ऑक्टो. ते १० नोव्हें.
प्रती एकर बियाणे – ३५ ते ४० किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – ११०-११५ दिवस
उत्पादकता – जिरायती – सरासरी १३ क्विं./हे., बागायत – सरासरी २० क्विं./हे.
वैशिष्टे / गुणधर्म – मर रोग प्रतिकारक्षम, बागायतास योग्य, आकर्षक पिवळसर तांबुस टपोरे दाणे अधिक बाजारभाव, पश्चिम महाराष्ट्राकरीता प्रसारित
३) हरभरा – दिग्विजय
प्रसारीत वर्ष – सन २००६
संशोधन केंद्राचे नांव – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
जमीन – मध्यम ते भारी काळी, खोली- ४५-६० सें.मी.
हवामान – तापमान : किमान १०-१५° से, कमाल २५-३०° से, आर्द्रता : २१-४१%, पाऊसमान : ७५०-१००० मिमी
पेरणीचा कालावधी – जिरायत : २० सप्टें. ते १० ऑक्टो., बागायत : २० ऑक्टो. ते १० नोव्हें.
प्रती एकर बियाणे – ३५ ते ४० किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – ९० ते ९५ दिवस (दक्षिण भारत)
उत्पादकता – जिरायत – सरासरी १४.०० क्विं./हे., बागायत – सरासरी २३.०० क्विं./हे., उशीरा पेर सरासरी २१.०० क्विं./हे.
वैशिष्टे / गुणधर्म – मर रोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादनक्षमता, टपोरे दाणे, जिरायत, बागायत तसेच उशीरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित
४) हरभरा – विराट
प्रसारीत वर्ष – सन २००१
संशोधन केंद्राचे नांव – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
जमीन – मध्यम ते भारी काळी, खोली- ४५-६० सें.मी.
हवामान – तापमान : किमान १०-१५° से, कमाल २५-३०° से, आर्द्रता : २१-४१%, पाऊसमान : ७५०-१००० मिमी
पेरणीचा कालावधी – जिरायत : २० सप्टें. ते १० ऑक्टो., बागायत : २० ऑक्टो. ते १० नोव्हें.
प्रती एकर बियाणे – ३५ ते ४० किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – १०५ ते ११० दिवस
उत्पादकता – जिरायत – सरासरी ११.०० क्विं./हे., बागायत – सरासरी १९.०० क्विं./हे.,
वैशिष्टे / गुणधर्म – काबुली वाण, मर रोग प्रतिकारक्षम, जास्त टपोरे दाणे, महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित
५) हरभरा – कृपा
प्रसारीत वर्ष – सन २००९
विद्यापीठ – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी द्वारे प्रसारीत
जमीन – मध्यम ते भारी काळी, ४५ ते ६० सें. मी. खोली
हवामान – तापमान – किमान १०-१५ अंश से. कमाल २५-३० अंश से.
पेरणीचा कालावधी – बागायती – २० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर
प्रति एकर बियाणे – ४५ ते ५० किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – १०५ ते ११० दिवस
उत्पादकता – बागायती – सरासरी १८ क्विं./हे.,
वैशिष्टे/गुणधर्म – अधिक टपोरे दाणे असलेला काबुली वाण, १०० दाण्यांचे वजन ५९.४ ग्रॅम, सफेद रंगाचे दाणे, सर्वाधिक बाजारभाव,
महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेश राज्याकरिता प्रसारित
👇👇👇👇
उर्वरीत टॉप ५ हरभरा सुधारीत वाणाबद्दल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
__________________________________________________________________________________
शेतीविषयक उपयुक्त माहिती आणि सर्व योजनांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप