Kharip Pik Vima Manjur:- शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ च्या पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे. ते म्हणजे खरीप २०२२ चा पीक विमा मंजूर (Kharip Pik Vima Manjur) करून वाटप सुरू करण्यात आले आहे. काल दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी पासून खरीप हंगाम २०२२ चा अग्रिम २५% पीक विमा शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे.
Kharip Pik Vima 2022
खरीप हंगाम २०२२ मध्ये जुलै – ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, सततचा पाऊस, किडींचा प्रादुर्भाव तसेच काही ठिकाणी पावसाचा खंड पडल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना पीक विमाधारक शेतकर्यांच्या नजरा ह्या पीक विमा मंजूर होणार की नाही? यांकडे लागल्या आहेत.
कोणत्या पिकासाठी मिळतोय पीक विमा? येथे क्लिक करून पहा
शासन निर्णय क्र. प्रपिवियो – २०२२/प्रक्र. ७२/११ ऐ, दि.०१ जुलै २०२२ मधील परिच्छेद क्रमांक १०.२ मध्ये नमूद केल्यानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती उदा.पूर, पावसातील खंड, दुष्काळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव इ. बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळ / महसूल मंडळ गट/ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.
परिच्छेद क्र. ११.१ अन्वये सदरची अधिसूचना जिल्हाधिकारी, अध्यक्ष, जिल्हास्तरीय संयुक्त समिती यांचेमार्फत निर्गमित करण्यात येते. सदरची अधिसूचना निर्गमित करताना खालील प्रातिनिधीक सूचकांच्या(Proxy Indicator) आधारे अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील अधिसुचित पीकांकरीता अधिसूचना निर्गमित करणेबाबत तरतूद आहे. आणि त्याच आधारावर अग्रिम पीक विमा वाटप करण्यासाठी खरीप हंगाम २०२२ मध्ये १६ ते १७ जिल्ह्यात अशाप्रकारची अधिसूचना काढण्यात आली होती.
८ दिवसांत पीक विमा खात्यात
Kharip Pik Vima Manjur
मित्रांनो, राज्यात सप्टेंबर महिन्यात १६ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी खरीप हंगाम २०२२ चा अग्रिम पीक विमा वाटप करण्यासाठी अधिसूचना निर्गमित केली होती. त्यानुसार जी मंडळे अधिसूचनेमध्ये पात्र ठरवण्यात आली होती, त्या मंडळातील पात्र शेतकर्यांच्या खात्यात पीक विमा २०२२ जमा होणे सुरू झाले आहे. दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ पर्यन्त हा पीक विमा उर्वरीत पात्र शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे.
कोणते मंडळ पात्र आहेत? येथे क्लिक करून पहा
www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.
*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप