सोयाबीनच्या दरात मागील १५ दिवसांमध्ये क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांची सुधारणा झाली आहे.

Soybean Bajar Bhav Today : सोयाबीन तेजीनंतर स्थिरावले

मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून सोयाबीनचे भाव काहीसे स्थिरावले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन भावात चढउतार सुरु आहेत.

सध्या देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

तर अनेक बाजारात कमाल दराने ६ हजार रुपयांचा टप्पा गाठलेला आहे.

तर काही बाजारांमध्ये कमाल दर ६ हजार ४०० रुपयांपर्यंतही पोचले होते.

पुढील काही दिवस शेतकऱ्यांना सरासरी ६ हजार रुपये दर मिळू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी.