Osmanabad Pik Vima 2022:- शेतकरी मित्रांनो, या खरीप हंगामात माहे जुलै ते ऑक्टोबर दरम्यान विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेले होते. त्यामुळे पीक नुकसानीच्या सूचना वेगवेगळ्या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.
Pik Vima 2022 Manjur
धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील प्राप्त तक्रारीनुसार पंचनामे व इतर प्रक्रिया पूर्ण झाली असून यामध्ये निष्पन्न झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपनीने निर्धारित केलेला २४१ कोटी रुपयांचा पिक विमा वितरित करण्यात येत आहे.
धाराशीव जिल्ह्यातील खरीप २०२० पीकविमा लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
धाराशीव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये नुकसानीचे क्षेत्र व तीव्रता जास्त असल्याने २५% अग्रीम देण्याची मागणी केली होती. त्यासाठी देखील १०४ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे, त्यांना पूर्ण रक्कम देण्यात येत असून पडताळणी करून आवश्यकते प्रमाणे शेतकऱ्यांना अग्रीमची रक्कम देखील देण्यात येईल.
नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या सर्व शेतकऱ्यांची पंचनाम्यासह इतर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात २४१ कोटी रुपये वितरित करण्यात येत आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानी प्रमाणे अनुज्ञेय पिक विमा वितरित केला जाणार आहे.
राज्य सरकारकडून देखील खरीप २०२२ मध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी भरीव मदत देण्यात आली आहे. यापोटी आजवर धाराशीव जिल्ह्याला सुमारे ३०४ कोटी रुपये मंजूर झाले, असून त्यातील २४५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. तसेच ५९ कोटी रुपये मंजूर असून, सदरील रक्कम देखील लवकरच प्राप्त होणार आहे.
याव्यतिरिक्त सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानी पोटी जिल्हा प्रशासनाकडून २२० कोटी रुपयांची केलेली मागणी प्रलंबित असून मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या रकमेस देखील मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.