Ativrushti Nuksan Bharpai List 2022: शेतकरी मित्रांनो, राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये परतीचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपट्टीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता, त्यानुसार Ativrushti Nuksan Bharpai च्या दुसर्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्ह्यांसाठी २२२ कोटी ३२ लाख ४५ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे लाखो बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
“या” १२ जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार २२२ कोटींची मदत
Ativrushti Nuksan Bharpai List 2022
जुन ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टी व पूर यांमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात होणार्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत महसूल व वन विभाग, शासन निर्णय दि. २२ ऑगस्ट २०२२ नुसार जिरायत पिकांसाठी १३,६०० रुपये प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी २७,००० रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी ३६,००० रुपये हेक्टर याप्रमाणे ३ हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करून हा निधी वितरीत करण्यात येणार आहे.
पहा तुमचा जिल्हा आहे का?
Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra
विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडून दि.२८.०९.२०२२, दि.१८.११.२०२२ व दि.२२.११.२०२२ व दि.२३.११.२०२२ च्या पत्रान्वये सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी रु. १८६२६.१९ लक्ष इतक्या रकमेचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. तसेच विभागीय आयुक्त, नागपूर यांचेकडून ऑक्टोबर, २०२२ या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी दि.२५.११.२०२२ च्या पत्रान्वये रु. ३१४४.३६लक्ष इतक्या रकमेचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. तसेच विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून दि. १२.१२.२०२२ रोजीच्या पत्रान्वये ऑगस्ट, २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी रु.४६१.९० लक्ष इतक्या अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुसार निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः
सप्टेंबर-ऑक्टोबर,२०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण रु.२२२३२.४५ लक्ष (अक्षरी रुपये दोनशे बावीस कोटी बत्तीस लक्ष पंचेचाळीस हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त, अमरावती, नागपूर व पुणे यांच्यामार्फत वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
याआधी १० जिल्ह्यांसाठी १२८६ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला असून, ते १० जिल्हा कोणते आहेत? हे पुढील लिंकवर क्लिक करून पहा: अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना १२८६ कोटींचा निधी मंजूर