Gharkul Yojana List Maharashtra

13.60 लाख घरकुल मंजूर, अशी डाऊनलोड करा घरकुल यादी | Gharkul Yojana List Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gharkul Yojana List Maharashtra: मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये राज्याला आतापर्यंत 14.26 लाख उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यापैकी 13.60 लाख (95%) मंजुरी दिली आहे. उर्वरित लाभार्थींच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मंजूर घरकुलांपैकी 9.48 लाख घरकुले विविध योजनांच्या कृतीसंगमातून पूर्ण झाली आहेत.

राज्य शासनाच्या आवास योजना जसे रमाई, शबरी, आदिम, पारधी, यशवंत, अटल यामधूनही घरकुलाचा लाभ देण्यात येतो. यामधील 5.15 लाख घरकुले मंजूर करण्यात आली असून 3.66 लाख घरकुले पूर्ण झाली आहेत. तर मित्रांनो घरकुल योजनेची यादी (Gharkul Yojana List 2023 Maharashtra) तुमच्या मोबाईलवर कशाप्रकारे डाऊनलोड करावी? याची सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.

या लेखात तुम्ही काय वाचाल?

Gharkul Yojana List Maharashtra

मित्रांनो, राज्यात अमृत महाआवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे मिळणार आहेत. या अभियानात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गतिमानतेने व गुणवत्तापूर्ण, दर्जेदार घरांची निर्मिती होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य शासनाच्या योजनांतून 13.14 लाख घरकुले पूर्ण करण्यात आली असून 5.61 लाख घरे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. Gharkul Yojana List Maharashtra

घरकुल योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

घरकुल योजनेची थोडक्यात माहिती

1) योजनेचे उद्दीष्ट

मित्रांनो, 2022 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेतून उदयास आलेली प्रधानमंत्री आवास योजना देशभरात सुरू करण्यात आली होती. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक कुटूंबाला जलजोडणी, शौचालयाची व्यवस्था 24 तास वीज आणि पोहच रस्ता या सुविधांसह पक्के घर असायला पाहिजे, हे प्रधानमंत्री आवास योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ही योजना महाराष्ट्र राज्यात दिनांक 1 ऑगस्ट, 2016 पासून ग्रामीण पातळीवर सुरू करण्यात आली होती. जिला पंतप्रधान आवास योजना ग्रामीण महाराष्ट्र असे नाव देण्यात आले.

2) महाराष्ट्र घरकुल योजनेची ठळक वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या दिनांक १४ ऑक्टोबर, २०१६ च्या शासन निर्णयानुसार राज्यात प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण राबविण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
  • यापूर्वी सुरू असलेली इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये करण्यात आलेले आहे.
  • योजनेअंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात निहाय जनगणना २०११ च्या यादीमधील ग्रामसभेमधून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
  • पात्र ठरलेल्या कच्चे घरधारक, बेघर लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी एकूण चार टप्प्यात 1,20,000/- (एक लाख वीस हजार) एवढे अनुदान देण्यात येते.
  • लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान PFMS ( Public Fund Monitoring System) च्या प्रणालीमधून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.
  • पंडित दिनद्याळ योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यास जागा नसलेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी ५०० चौ. फुटापर्यंत जागे खरेदी करिता जागेची किंमत किंवा रु. ५०,०००/- यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देण्यात येते. Gharkul Yojana List Maharashtra

3) घरकुल योजना (प्रधानमंत्री आवास योजना) अंतर्गत लाभार्थ्यास मिळणारे अनुदान खालील ४ हप्त्यामध्ये वितरण केले जाते.

  1. घरकुल मंजुरी नंतर लगेच दिला जाणारा पहिला हप्ता – रु. 15,000/-
  2. घरकूलाचे बांधकाम पाया पर्यंत झाल्यावर दिला जाणारा दुसरा हप्ता – रु. 45,000/-
  3. घरकुलाचे बांधकाम छता पर्यंत झाल्यावर दिला जाणारा तिसरा हप्ता – रु.40,000/-
  4. घरकुलाचे बांधकाम शौचालयासह बांधकाम पूर्ण झाल्यावर दिला जाणारा चौथा हप्ता – रु. 20,000/-

एकूण घरकुल अनुदान रक्कम – रु. 1,20,000/- (एक लाख वीस हजार)

घरकुल अनुदान व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत 90 दिवसांच्या अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.

घरकुल योजनेसाठी लागणारी पात्रता आणि कागदपत्रे

1) घरकुल योजना पात्रता

  • दारिद्र्य रेषेखालील, बेघर असलेल्या व्यक्ती, ज्यांच्या नावावर किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर देशात कुठेही घर किंवा मालमत्ता नसावी
  • सरकारी सेवेत कार्यरत नसलेले व्यक्ती.
  • आयकर भरत नसलेले व्यक्ती
  • अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही घरकुल (गृहनिर्माण) योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

2) घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

महाराष्ट्र घरकुल योजना 2022 योजनेचा (प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण) लाभ घेण्यासाठी ग्रामसभेद्वारे निवड करण्यात आलेल्या पात्र लाभार्थ्यांनी घरकुल अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक असते.

  1. जागेचा ७/१२ उतारा
  2. मतदार ओळखपत्र
  3. आधार कार्ड
  4. चालू वर्षाची कर भरल्याची पावती (दिवाबत्ती कर, घरपट्टी, पाणी पट्टी)
  5. रहिवाशी दाखला
  6. उत्पन्नाचा दाखला
  7. पक्के घर नसल्याचे हमीपत्र
  8. दिलेली माहीत खरी असल्याचे स्वयंघोषणापत्र/हमीपत्र
  9. फोटो

घरकुल योजनेची यादी कशी पहावी? (Gharkul Yojana List Maharashtra)

मित्रांनो, राज्यात सन 2016-17 पासून प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (Gharkul Yojana List Maharashtra) ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1,20,000/-नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1,30,000/- प्रति लाभार्थी अर्थसाहाय्य देण्यात येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येत आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानातंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी देखील उपलब्ध करून दिला जातो. तर मित्रांनो आता घरकुल योजनेची यादी (Gharkul Yojana List Maharashtra) कशी पहावी? हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

घरकुल योजनेची यादी कशी पहावी? येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top