Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra: शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना प्रचलित दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत दुपट्टीने मदत देण्याचा राज्य शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला होता, त्यानुसार Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra च्या दुसर्या टप्प्यात आता राज्यातील 10 जिल्ह्यांसाठी 675 कोटी 45 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे लाखो बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra
जून ते ऑक्टोबर, 2022 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता/शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांचे नुकसान व शेतजमिनीचे नुकसान याकरिता मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण रु. 5661.39 कोटी इतका निधी दि.08/09/2022, दि. 14/09/2022, दि.28/09/2022, दि.02/11/2022, दि.17/11/2022, दि.23/11/2022 व दि.15/12/2022 च्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सविस्तर माहिती येथे पहा
6 लाख 32 हजार 892 शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता 675 कोटी 45 लाख 10 हजार रुपये
शासन निर्णयः
सप्टेंबर-ऑक्टोबर,2022 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण रु.67611.47 लक्ष (अक्षरी रुपये सहाशे श्याहत्तर कोटी अकरा लक्ष सत्तेचाळीस हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त, नाशिक व पुणे यांच्यामार्फत वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
तुमच्या जिल्ह्याला किती? येथे क्लिक करून पहा