Kharip Pik Vima Manjur

खरीप हंगाम 2022 करिता 724 कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर | 2022 Kharip Pik Vima Manjur

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kharip Pik Vima Manjur: शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022 च्या पीक विमा संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे. खरीप 2022 करिता 724 कोटींपेक्षा जास्त निधी मंजूर (Kharip Pik Vima Manjur) करण्यात आला आहे.

दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी यासंदर्भातील अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तर त्याच संदर्भात आजच्या ह्या लेखात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

या लेखात तुम्ही काय वाचाल?

Kharip Pik Vima Manjur

मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन 2022 साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. 724,51,46,809/- इतकी रक्कम विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत {Kharip Pik Vima Manjur} दिनांक 13 जानेवारी 2023 रोजी शासन निर्णय घेण्यात आला असून, त्याची प्रस्तावना पुढीलप्रमाणे आहे.

खरीप पीक विमा २०२२ ची राज्याची आकडेवारी येथे क्लिक करून पहा

प्रस्तावना

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 शासन निर्णय दि.01/07/2022 अन्वये भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं.लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपनींमार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषि विमा कंपनीने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत उपरोक्त 5 कंपन्यांचा एकत्रित मिळून पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे. आयुक्त कार्यालयाने केलेल्या विनंतीस अनुसरून रु. 724 कोटी 51 लाख 46 हजार 809 इतकी रक्कम पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान विमा कंपन्यांस अदा करण्यासाठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून शासन निर्णय घेण्यात आला आहे. Kharip Pik Vima Manjur

10 जिल्ह्यांना 675 कोटींची नुकसान भरपाई मंजूर

शासन निर्णय

भारतीय कृषि विमा विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषि आयुक्तालयाची शिफारस विचार करता प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 अंतर्गत भारतीय कृषि विमा कंपनी, आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इंशुरन्स कं. लि., बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व युनायटेड इंडिया इंन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपन्यांना पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रु. 724,51,46,809/- इतकी रक्कम अदा करण्यासाठी वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरची रक्कम खरीप हंगाम 2022 करीता वितरीत करण्यात येत असून त्याचा वापर यापर्वीच्या इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर मित्रांनो अतिशय उपयुक्त अशी माहिती आज आपण जाणून घेतली आहे. अशाच प्रकारची शेतीविषयक उपयुक्त माहिती नेहमी पाहत राहण्यासाठी आमच्या http://www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

तुम्ही आमच्या Whatsapp ग्रुप ला देखील जॉइन होऊ शकता.
Whatsapp ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी 👉👉 येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top