Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra: शेतकरी मित्रांनो, यंदा खरीप हंगाम 2022-23 मध्ये राज्यात जुन ते ऑक्टोबर दरम्यान नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी तसेच सततच्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीसाठी मदत म्हणून राज्य शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) जाहीर केली.
आता जानेवारी संपत आला तरी राज्य शासनाद्वारे शेतकर्यांना जाहीर करण्यात आलेली अतिवृष्टी नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) मात्र प्रत्यक्ष बर्याच शेतकर्यांना मिळालेली नाही. यादी तयार करताना शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक चुकवणे तसेच इतर तपशील चुकविणे यांसारख्या विविध कारणांमुळे शेतकर्यांना देण्यात येणारी अतिवृष्टी मदत रखडलेली आहे. त्यातच आता शासनाने अतिवृष्टी मदतीचे वाटप आता नवीन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.
Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra
मित्रांनो, अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाल्यानंतरही त्यांना जाहीर करण्यात आलेली नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही. मदतीचे वाटप करण्यात बराच वेळ निघून जातो. हीच बाब लक्षात घेत शासनाने आता अतिवृष्टी मदतीचे वाटप नवीन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा सविस्तर शासन निर्णय दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तर या शासन निर्णयानुसार नवीन पद्धत कोणती असणार आहे? हे जाणून घेण्याआधी जुनी पद्धत कशी होती? हे जाणून घेऊयात.
“या” 10 जिल्ह्यांना 675 कोटींची नुकसान भरपाई मंजूर
अशी होती नुकसान भरपाई वाटपाची जुनी पद्धत
मित्रांनो, राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई देण्यासाठी लागणार्या निधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर करण्यात येतो. शासनाकडून निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर सदर निधी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीवर (बीडीएस) विभागीय आयुक्त यांना वितरीत करण्यात येतो. विभागीय आयुक्त हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरीत करतात.
संबंधित जिल्हाधिकारी हा निधी संबंधित तहसीलदार यांना वितरीत करतात. संबंधित तहसीलदार हे कोषागारात देयक सादर करून रक्कम आहरीत करतात. ही रक्कम तहसीलदारांकडे असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यानंतर मदतीचा निधी बाधित व्यक्तींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतो. सदर प्रकियेमध्ये शासनास प्रस्ताव प्राप्त होणे, प्रस्तावास शासन मान्यता मिळाल्यानंतर त्याबातचा निधी प्राप्त होऊन बाधितांना मदत वितरीत करेपर्यंत बराच कालावधी जातो. हीच बाब लक्षात घेत शासनाने आता नवीन पद्धतीने अतिवृष्टी नुकसान भरपाई {Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra} वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाची नवीन पद्धत
मित्रांनो, शासन निर्णय सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, दि. 29/07/2022 अन्वये महात्मा जोतिराव फुले ‘शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून MAHA IT यांची Portal साठी तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ज्या पध्दतीने प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो, त्याच धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या पात्र बाधित व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचा निधी प्रचलित कार्यपध्दतीनुसार म्हणजेच वर नमूद केलेल्या जुन्या पद्धतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडून यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करुन निधी वितरीत करण्याच्या प्रस्तावास विभागीय प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दिनांक 04/11/2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे.
शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता पात्र शेतकऱ्यांना द्यावयाचा मदतीचा निधी आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यासाठी सुधारित कार्यपध्दती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणून सदर शासन निर्णय घेऊन अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाची नवीन पद्धत सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाची नवीन पद्धत कशी असेल हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.