Nuksan Bharpai Maharashtra: गेल्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पावसामुळे आठ जिल्ह्यांत सुमारे 13 हजार 729 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तत्काळ मदत (Nuksan Bharpai Maharashtra) देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
Nuksan Bharpai Maharashtra
विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य नाना पटोले, छगन भुजबळ यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री बोलत होते.
येथे क्लिक करून पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार येथे 760 हेक्टरचे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यात 2685 हेक्टरचे नुकसान झाले आहे. धुळे येथे 3144 हेक्टर, नंदूरबार येथे 1576 हेक्टर, जळगाव येथे 214 हेक्टर, अहमदनगर येथे 4100 हेक्टर, बुलढाणा येथे 775 हेक्टर तर वाशीम जिल्ह्यात 475 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. नुकसानासंदर्भात अधिकची माहिती घेण्यात येत असून तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अहवाल प्राप्त होताच सभागृहात याबाबत निवेदन करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करा: मुख्यमंत्री