Gas Subsidy 2023: गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसतोय, परंतू आता केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी दिली असून, पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना LPG गॅस सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी (Gas Subsidy 2023) जाहीर केली आहे.
सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासदायक निर्णय असून, आधीच महागाईने कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना या 200 रुपये गॅस सबसिडी {Gas Subsidy 2023} मोठा दिलासा मिळणार आहे.
रेशन कार्डवर अन्नधान्याऐवजी पैसे मिळणार, असा करा अर्ज
Gas Subsidy 2023
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारने प्रति LPG सिलेंडरवर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली असून, हे अनुदान 14.2 किलोच्या 12 LPG सिलिंडर वर देण्यात येणार आहे.
येत्या 1 एप्रिल 2023 म्हणजेच नवीन आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू होणार आहे. आता केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडर वर 200 रुपये म्हणजेच एका वर्षात सबसिडीच्या स्वरुपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
या संदर्भात केंद्रीय 24 मार्च 2023 रोजी निर्णय घेतला आहे, त्याबद्दल थोडक्यात माहिती या लेखात पाहुयात.
LPG Gas Subsidy 2023 Cabinet Decision
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयुवाय) लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 200 रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे. 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झाली.
2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 साठी 7,680 कोटी रुपये खर्च केले जातील. पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.
सबसिडी संदर्भातील अधिकृत मंत्रिमंडळ निर्णय येथे क्लिक करून पहा
विविध भू-राजकीय कारणांमुळे एलपीजी (घरगुती वापरासाठीचा गॅस)च्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झाली आहे. एलपीजीच्या वाढलेल्या दरांपासून लाभार्थींचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
ग्राहकांना एलपीजीच्या दरात दिलासा दिला तर ते एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात. उज्ज्वला योजनेतल्या ग्राहकांनी पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळावे यासाठी त्यांनी सतत एलपीजीचा अवलंब आणि वापर करणे महत्त्वाचे आहे योजनेतील ग्राहकांचा एलपीजीचा सरासरी वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरून 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे. सर्व लाभार्थी या अनुदानासाठी पात्र आहेत.
ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी), स्वच्छ स्वयंपाक इंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. गरीब घरातील प्रौढ महिलांना डिपॉझिट न ठेवता मोफत एलपीजी जोडणी या योजनेअंतर्गत दिली जाते.
Cabinet approves targeted subsidy to Pradhan Mantri Ujjwala Yojana Consumers
A subsidy of Rs.200 per 14.2 kg cylinder for up to 12 refills per year to be provided to the beneficiaries
Read more: https://t.co/O5Gn3hpt5K #CabinetDecisions pic.twitter.com/CqpycsRpVp
— PIB India (@PIB_India) March 24, 2023