Namo Shetkari Sanman Nidhi Yojana

नमो शेतकरी सन्मान निधी योजना | Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana: नुकत्याच सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Sanman Nidhi Yojana) सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे.

राज्याचा 2023-24 या वर्षाचा 5 लाख 47 हजार 450 कोटींचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक 9 मार्च 2023 रोजी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सादर केला. देशाच्या अमृतकाळातील पंचामृतावर आधारित अर्थसंकल्पात ‘शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी’ या घटकासाठी 29 हजार 163 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी शेतकरी कोण? येथे क्लिक करून पहा

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासन  राज्यातील 1 कोटी 15 लाख कुटुंबांसाठी ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ {Namo Shetkari Sanman Nidhi Yojana} राबवणार असल्याची  घोषणा वित्तमंत्र्यांनी  केली आहे.

या नवीन योजनेतंर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केंद्र शासन आणि राज्यशासन यांच्यामार्फत प्रत्येकी 6000 रुपये असे एकूण 12,000 रुपयांचा सन्माननिधी प्रतिवर्षी मिळणार आहे, त्यासाठी 2023-24 मध्ये 6 हजार 900 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. तर योजनेतील ठळक मुद्दे पाहुयात.

Namo Shetkari Yojana 2023

  • महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता वार्षिक 12 हजार रूपयांचा सन्मान निधी मिळणार
  • राज्य शासनाच्या या योजनेस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आले आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (Namo Shetkari Sanman Nidhi Yojana) असे नाव देण्यात आले आहे.
  • प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य शासन देणार आहे.
  • केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक 6000 रुपये आणि राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या (Namo Shetkari Sanman Nidhi Yojana) माध्यमातून 6000 रुपये असे वार्षिक 12,000 रुपये पात्र शेतकर्‍यांना मिळणार आहे.
  • महाराष्ट्रातील जवळपास 1.15 कोटी शेतकरी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • या योजनेकरिता 6900 कोटी रूपयांचा भार राज्य शासन उचलणार आहे.

रेशन कार्डवर अन्नधान्याऐवजी पैसे मिळणार, असा करा अर्ज

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी?

शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा तर शासनाने केलीच आहे, परंतू या योजनेसाठी अर्ज किंवा नोंदणी कधी सुरू येईल, याबाबत अजून कोणतीही सविस्तर माहिती शासनाकडून देण्यात आलेली नाही. परंतू एप्रिल 2023 मध्ये ह्या योजनेचा पहिला हप्ता मिळू शकतो आणि पहिल्या हप्त्यापोटी राज्य शासन 1600 कोटी रुपये निधी मंजूर करू शकते, अशी शक्यता आहे.

📽️ नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता “या” महिन्यात

 

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023 Overview

योजनेचे नावनमो शेतकरी महासन्मान निधी योजना

(Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana)

योजनेची घोषणामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाभार्थीराज्यातील पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेले सर्व पात्र लाभार्थी
लाभवार्षिक 6000 रुपये
वर्ष2023
शासन निर्णयअजून GR आलेला नाही
अधिकृत संकेतस्थळ

 

 

तर मित्रांनो, अशाप्रकारे राज्य शासनाची नवीन योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची थोडक्यात माहिती आपण आज जाणून घेतली आहे. या योजनेचे सर्व अधिकृत अपडेट्स तुम्हाला आपल्या वेबसाईट वर मिळत राहतील, त्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला भेट देत रहा.  

🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group


 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top