Kharip Pik Vima Manjur

“या” जिल्ह्यांत २५% अग्रीम पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा | Kharip Pik Vima Manjur Nanded

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kharip Pik Vima Manjur Nanded – शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ मध्ये जुलै – ऑगस्ट महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, सततचा पाऊस, किडींचा प्रादुर्भाव तसेच काही ठिकाणी पावसाचा खंड पडल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना पीक विमाधारक शेतकर्‍यांच्या नजरा ह्या पीक विमा मंजूर होणार की नाही? यांकडे लागल्या आहेत.

६ जिल्ह्यात २५% अग्रीम पीक विम्याची अधिसूचना निर्गमित

त्यातच आता पीक विमाधारक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील ६ जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगाम २०२२ चा २५% अग्रीम पीक विमा मंजूर (Pik Vima Manjur) करण्यासाठी विमा कंपनीला आदेश देण्यात आले आहेत आणि तशाप्रकारची अधिसूचना जिल्हाधिकार्‍यांमार्फत निर्गमित करण्यात आली आहे. तर सर्वप्रथम अशी अधिसूचना नांदेड जिल्ह्यात निर्गमित करण्यात आली आहे. तर नांदेड जिल्ह्यातील कोणते मंडळ २५% पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत? हे आपण आजच्या ह्या लेखामध्ये जाणून घेऊ शकता. Kharip Pik Vima Manjur Nanded

कोणते मंडळ पीक विम्यासाठी पात्र आहेत? येथे क्लिक करून पहा

 

तर शासन निर्णय क्र. प्रपिवियो – २०२२/प्रक्र. ७२/११ ऐ, दि.०१ जुलै २०२२ मधील परिच्छेद क्रमांक १०.२ मध्ये नमूद केल्यानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती उदा.पूर, पावसातील खंड, दुष्काळ, किड व रोगांचा प्रादुर्भाव इ. बाबींमुळे अधिसूचित महसूल मंडळ / महसूल मंडळ गट/ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये गत ७ वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.

परिच्छेद क्र. ११.१ अन्वये सदरची अधिसूचना जिल्हाधिकारी, अध्यक्ष, जिल्हास्तरीय संयुक्त समिती यांचेमार्फत निर्गमित करण्यात येते. सदरची अधिसूचना निर्गमित करताना खालील प्रातिनिधीक सूचकांच्या(Proxy Indicator) आधारे अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील अधिसुचित पीकांकरीता अधिसूचना निर्गमित करणेबाबत तरतूद आहे.

तर ते प्रातिनिधीक सूचक (Proxy Indicator) पुढीलप्रमाणे आहे.

  1. तीव्र दुष्काळ स्थिती (दुष्काळ संहिता २०१६ नुसार)
  2. पावसातील ३-४ आठवडयापेक्षा जास्त खंड आल्याने एकूण पावसाचे कमी झालेले प्रमाण
  3. तापमानातील असाधारण घट/वाढ (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्केपेक्षा जास्त तफावत)
  4. पर्जन्यमानातील असाधारण कमी/जास्त प्रमाण (दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत २० टक्केपेक्षा जास्त तफावत)
  5. मोठया प्रमाणात किड, रोग यांचा पिकांवरील प्रादुर्भाव (पिक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावर तीव्र प्रादुर्भाव)
  6. इतर नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती ज्यामुळे एकूण पिक पेरणी क्षेत्राच्या २५ टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्यास.

 पीक विमा लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

वरील बाबींकरीता शासकीय यंत्रणांचा अहवाल, पिक परिस्थितीबाबत शास्त्रज्ञांचे अहवाल, वृत्तपत्र किंवा वर्तमानपत्रात प्रसिध्द बातम्या व प्रत्यक्ष पिक परिस्थितीच्या सर्वेक्षण इत्यादींच्या आधारावर संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय संयुक्त समिती, प्रधानमंत्री पिक विमा योजना हे अधिसूचना काढून प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे या बाबी अंतर्गत वरील नमूद प्रातिनिधीक सुचक (Proxy Indicator) च्या आधारे नमूद अधिसूचित विमा क्षेत्र घटकातील अधिसुचित पीकांकरीता राज्य शासनाचे अधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यास नुकसान भरपाईस पात्र असल्याचे विनिर्दिष्ट करीत असतात.

त्यामुळे शासन निर्णय क्र. प्रपिवियो – २०२२/प्रक्र. ७२/११ , दि. ०१ जुलै २०२२ अन्वये व नांदेड जिल्ह्यातील जिल्हास्तरीय संयुक्त समिती, प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या दिनांक १३ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीतील चर्चेनुसार व प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार नमूद केलेल्या अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन, तुर, कापूस व खरीप ज्वारी या अधिसूचित पिकांसाठी संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांना आदेशित करण्यात आले आहे.

तर नांदेड जिल्ह्यातील कोणते मंडळ पात्र आहेत? हे पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून अधिसूचना पहा :

नांदेड जिल्हा २५% अग्रीम पीक विमा अधिसूचना

Kharip Pik Vima 2022 Manjur – सदर आदेशानुसार युनायटेड इंडिया इंन्शुरन्स क.लि. यांनी ही अधिसुचना जाहीर झाल्यापासुन १ महिन्याच्या आत या तरतूदी नुसार पात्रठरलेल्या सोयाबीन, कापूस, तुर व ख. ज्वारी या अधिसुचित पिकांकरीता उपरोक्त महसुल मंडळातील सर्व पिक विमा धारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी.

सुदर जोखीम अंतर्गत उपरोक्त बाधित अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित सोयाबीन, कापूस, तुर व ख. ज्वारी पिक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केल्यानंतर उपरोक्त अधिसुचित विमा क्षेत्रातील सोयाबीन, तुर, कापूस व खरीप ज्वारी पीक विमाधारक शेतकरी हे पीक हंगामाच्या शेवटी उत्पादनाच्या आधारे रक्कमही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल.

तर मित्रांनो, अशाप्रकारे नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ चा २५% अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. इतर जिल्हयांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या www.batamaikamachi.com या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top