Aadhar Bank Linking Status: मित्रांनो, आजकाल शासन कोणत्याही योजनेचे अनुदान असो वा इतर कोणतेही अनुदान हे आधार मार्फत डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करत आहे. त्यासाठी आधार NPCI ला लिंक असणे आवश्यक असते. परंतू लाभार्थ्यांचे आधार नेमके कोणत्या बँकेला लिंक आहे? (Aadhar Bank Linking Status) हे कसे चेक करावे? हे अनेकांना माहीत नसते.
म्हणूनच आजच्या ह्या लेखात आपण आधार कोणत्या बँकेला लिंक आहे? हे कसे चेक करावे? हे जाणून घेणार आहोत, तसेच समजा आधार कोणत्याही बँकेला लिंक नसेल तर ते कसे लिंक करावे? याची सविस्तर माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा आणि इतरांसोबत नक्की शेअर करा.
नमो शेतकरी योजनेसाठी “हे” शेतकरी ठरणार अपात्र
👇👇👇
Aadhar Bank Linking Status
मित्रांनो, तुमचे आधार नेमके कोणत्या बँक खात्यास लिंक आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्ही तुमच्या मोबाईल वरच हे चेक करू शकता. परंतु हे सर्व जाणून घेण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही “Aadhar Bank Linking Status” चेक करू शकता.
- सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावरील “Resident Portal” वर जावे लागेल. त्याची लिंक पुढे दिली आहे. आधार कार्डच्या Resident Portal वर जाण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
- आधार कार्डचे Resident Portal वर तुमच्या मोबाईल मध्ये ओपन झाल्यावर “Aadhar Services” या पर्यायाखालील Check Aadhaar/Bank Seeding Status या ऑप्शनवर क्लिक करावे.
- Check Aadhaar/Bank Seeding Status या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक अचूक नोंदवावा लागेल आणि खाली देण्यात आलेला Captcha Code टाकावा लागेल.
- तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि खाली देण्यात आलेला Captcha Code अचूकरीत्या टाकल्यानंतर Send OTP या बटणावर क्लिक करावे.
- तुमच्या आधार क्रमांकाला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवण्यात येईल, तो ओटीपी अचूकरीत्या टाकून Submit या बटणावर क्लिक करावे.
- Submit केल्यानंतर आता तुमचे आधार – बँक लिंकिंग स्टेटस (Aadhar Bank Linking Status) तुम्हाला दिसेल.
- यामध्ये तुमचे Bank Seeding Status, तुम्ही कोणत्या तारखेला आधार बँकेला लिंक केला आणि खाली त्या बँकेचे नाव, ही सर्व माहिती तुम्हाला दिसेल.
तुमचे आधार बँक लिंकिंग स्टेटस चेक करण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा
तुमच्या खात्याला आधार लिंक नसेल, तर काय करावे?
मित्रांनो, वरीलप्रमाणे आधार – बँक लिंकिंग स्टेट्स (Aadhar Bank Linking Status) चेक केल्यावर जर तुमचे आधार कार्ड कोणत्याही बँकेला लिंक नसेल तर तुम्हाला शासनाकडून दिले जाणारे विविध अनुदान डीबीटी मार्फत तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.
तर त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार बँक खात्यास लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर बँक खात्यास आधार लिंक करण्यासाठी तुम्हाला NPCI Mapping करावे लागेल. म्हणजेच तुम्हाला Aadhar Seeding चा फॉर्म बँकेत भरावा लागेल.
बँक खात्यास आधार लिंक करण्यासाठीचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
वरील फॉर्म सोबत आधार कार्डची झेरॉक्स जोडून देणे आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यास आधार लिंक होईल.
किंवा मग तुम्ही पोस्टाचे खातेसुद्धा उघडू शकता, जे लवकरात लवकर आधारशी लिंक होऊन जाते आणि तुम्हाला शासनाचे कोणतेही अनुदान मिळण्यास अडचण जात नाही.
पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी आधार बँक खात्यास लिंक असणे आवश्यक
शेतकरी मित्रांनो, केंद्र शासनाची पीएम किसान योजना आणि राज्य सरकारची नव्याने सुरू झालेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यास आधार लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे वरील स्टेप्स मध्ये तुम्ही तुमचे आधार बँक लिंकिंग स्टेट्स चेक करून घ्या आणि जर तुमच्या बँक खात्यास आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्ही दोन्ही योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना संपूर्ण माहिती येथे पहा
तर मित्रांनो, अशाप्रकारे अतिशय सोप्या शब्दांत आज आपण आधार बँक लिंकिंग स्टेट्स कसे चेक करावे? याबद्दल हा लेख वाचला. आशा करतो की आपणांस हा लेख उपयुक्त राहील. त्यामुळे हा लेख इतरांपर्यंत नक्की शेअर करा.
नमो शेतकरी सन्मान निधी योजना आणि शासनाच्या इतर सर्व योजनांचे सर्व अधिकृत अपडेट्स तुम्हाला आपल्या वेबसाईट वर मिळत राहतील, त्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला भेट देत रहा.
🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group