Kharip Pik Vima 2022 – खरीप हंगाम २०२२ मध्ये अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता पीक विमा धारक शेतकर्यांना २५% अग्रीम पीक विमा देण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु विमा कंपनीने याविरुद्ध अपिल दाखल करीत उत्पादकता कमी येणार नसल्याचा दावा केला आहे. विमा कंपनीच्या संयुक्त सर्व्हेक्षणांमध्ये अपेक्षित उत्पन्न चांगले, सरासरी पीक परिस्थिती दर्शवीत असल्याचे समोर आले आहे.
Kharip Pik Vima 2022 Update
खरीप हंगाम २०२२ मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY) नवीन स्वरुपात राबविली जात असल्याने तसेच बीड पॅटर्न स्वीकारला गेल्याने अनेक शेतकरी बांधवांनी यावर्षी पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
परंतू खरीप हंगाम २०२२ मध्ये जुलै ते ऑगस्ट महिन्यात राज्यभर अतिवृष्टी, पूर व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना पीक विमा काढलेल्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळेल अशी अपेक्षा होती.
प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदाच्या हंगामात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने ६ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत जोखमीच्या बाबीअंतर्गत नुकसान भरपाई निश्चित करीत विमा काढलेल्या पीक विमाधारक शेतकर्यांना संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याबाबत विमा कंपनीला निर्देश दिले होते. तशाप्रकारची अधिसूचना ६ जिल्ह्यात काढण्यात आली होती. मात्र ही बाब कंपनीने अमान्य केली असून, याविरुद्ध अपील दाखल केले आहे. त्यावर पहिली सुनावणीसुद्धा सोमवारी दिनांक २६ सप्टेंबर रोजी झाली आहे. Kharip Pik Vima 2022
नांदेड, अकोला, लातूर, परभणी, अमरावती आणि धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील पात्र मंडळातील शेतकऱ्यांना अधिसूचित पिकांसाठी पीक विम्याची २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याबाबत वरील ६ जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी तशाप्रकारची अधिसूचना निर्गमित केली होती. या उपरोक्त ६ जिल्ह्यातील नियुक्त विमा कंपनीने अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत अधिसूचित पिकासाठी पात्र महसूल मंडळातील विमाधारकांना २५% अग्रीम पीक विमा द्यावा, असे सुचविले होते.
अतिवृष्टी, पूर, पावसातील खंड, दुष्काळ, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आदी बाबींमुळे शेतकऱ्यांना चालू वर्षाच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या २५ टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. या बाबत अधिसूचना जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांना पीक विमा मंजूर करून अधिसूचना काढण्याचे अधिकार मिळालेले आहे. त्याचा वापर करीत उपरोक्त ६ जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीला निर्देश दिले.
नांदेड जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तुर आणि खरीप ज्वारी या अधिसूचित पिकांसाठी, अकोला जिल्ह्यात सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी २४ मंडळे, परभणी जिल्ह्यात सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी ८ मंडळे, लातूर जिल्ह्यात सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी १४ मंडळे, अमरावती जिल्ह्यात सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी ८० मंडळे तसेच उस्मानाबाद (धाराशीव) जिल्ह्यात सोयाबीन या अधिसूचित पिकासाठी १५ मंडळांचा २५% अग्रीम पीक विमा मंजूर करण्यासाठी अधिसूचनेत समावेश करण्यात आला होता.
विमा कंपनीने याविरुद्ध अपिल दाखल करीत उत्पादकता कमी येणार नसल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या संयुक्त सर्व्हेक्षणांमध्ये अपेक्षित उत्पन्न चांगले, सरासरी पीक परिस्थिती दर्शवीत आहे. यासाठी आम्ही वास्तविक पीक स्थिती दर्शविणारी छायाचित्रे सादर करू, या हंगामात उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी येणार नाही, असा दावाही कंपनीच्या वतीने करण्यात आला. मात्र जिल्हा प्रशासनाने कंपनीचे दावे अमान्य केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता कंपनीकडून आता पुढील अपील राज्यस्तरावर केल्या जाण्याची शक्यता आहे.
Kharip Pik Vima 2022
यंदा झालेला सततचा पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे पिकांचे नुकसान पाहता जिल्हा प्रशासनाने विमा कंपनीला २५ टक्के रक्कम आगाऊ देण्याचे निर्देश दिले होते. पण तेच अमान्य करीत कंपनीने अपील दाखल केल्याने आता दसरा-दिवाळीत अपेक्षित असणारी संभाव्य मदत लटकल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आधीच नुकसानीने हवालदिल झालेला शेतकरी पीक विमा मिळण्यास विलंब झाल्यास निराश होणार आहे.
विमा कंपनी ज्या पुराव्यांच्या आधारे उत्पादन कमी होणार नसल्याचे सांगत आहे, त्या बाबी आणि ग्राऊंड लेव्हलवरील परिस्थिती यात मोठी तफावत आहे.
तर मित्रांनो, अशाप्रकारे शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ पीक विमा देण्यास विमा कंपनीने नकार दिला आहे, ही माहिती निश्चितच शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. पुढील काही अपडेट आल्यास ते आपण आपली www.batamikamachi.com या वेबसाईटच्या माध्यमातून नक्की जाणून घेऊ. त्याकरिता तुम्ही आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.