Nuksan Bharpai Maharashtra: शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत (Nuksan Bharpai Maharashtra) देण्याचा निर्णय दिनांक 13 जून 2023 रोजी झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार आहे.
🌾🌾 खरीप हंगाम 2023-24 चे नवीन हमीभाव जाहीर 🌾🌾
👉👉 खरीप पिकांचे नवीन हमीभाव येथे क्लिक करून पहा 👈👈
Nuksan Bharpai Maharashtra
सततचा पाऊस ही राज्य शासनामार्फत नवीन आपत्ती घोषित करुन मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या 5 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
📃📃 दिनांक 13 जून 2023 रोजीचे इतर मंत्रिमंडळ निर्णय 📃📃
असे असतील मदतीचे दर
केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर सुधारित केले आहेत. त्यानुसार जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर 8500 रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 17 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 22500 रुपये प्रति हेक्टर अशी 2 हेक्टरच्या मर्यादेत ही मदत देण्यात येईल.
#मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions pic.twitter.com/H7flzJPtiv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 13, 2023
शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय सततच्या पावसामुळे नुकसानीपोटी 1500 कोटी रुपयांना मंजुरी#CabinetDecision #मंत्रिमंडळ_निर्णय #farmer #agriculture pic.twitter.com/tQRzIL97EF
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 13, 2023
#मंत्रिमंडळनिर्णय
गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय. सुमारे १५.९६ लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील २७.३६ लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल. pic.twitter.com/tjErokYyYg— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 13, 2023
शासनाच्या सर्व योजनांचे सर्व अधिकृत अपडेट्स तुम्हाला आपल्या वेबसाईट वर मिळत राहतील, त्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला भेट देत रहा.
🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group