Pik Vima 2023 Last Date

Pik Vima 2023 Last Date: पीक विमा भरण्यास, आता “या तारखेपर्यंत पीक विमा भरता येणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Vima 2023 Last Date: शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 चा पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पीक विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

त्यामुळे आता केंद्र सरकारकडून पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली असून, नेमकं कोणत्या तारखेपर्यंत पीक विमा अर्ज भरता येणार, हे आपण आजच्या ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

👇👇👇

खरीप हंगाम 2023 मध्ये तुमच्या जिल्ह्यात कोणती पीक विमा कंपनी असेल जाणून घ्या

Pik Vima 2023 Last Date

पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 3 ऑगस्ट 2023 (Pik Vima 2023 Last Date) पर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आधी 31 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती.

👇👇👇

येथे क्लिक करून पीएम किसान स्टेट्स चेक करा तुमच्या मोबाईल वरच

शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज भरून घ्यावेत – कृषिमंत्री

आजपर्यंत राज्यात तब्बल एक कोटी पन्नास लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील चोवीस तासात 7 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरला आहे.

मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top