Ativrushti Nuksan Bharpai 2022 | दुसर्‍या टप्प्यात ३३५ कोटींची नुकसान भरपाई मंजूर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai 2022 – शेतकरी मित्रांनो, जून ते ऑगस्ट, २०२२ पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत दिनांक २८ सप्टेंबर, २०२२ शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार ३३५ कोटींची नुकसान भरपाई (Nuksan Bharpai) वितरीत केली जाणार आहे. तर कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार? चला जाणून घेऊयात.

Ativrushti Nuksan Bharpai 2022

प्रस्तावना:

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्तीप्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. राज्यात जुलै,२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत, तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि.१० ऑगस्ट २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२२/प्र.क्र.२५३/म-३, दि.२२.०८.२०२२ अन्वये जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. तर शासन निर्णय काय आहे? हे जाणून घेऊयात.

शासन निर्णयः

जून ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. १ व २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके नुकसानीकरिता रू.३३४९३.७९ लक्ष व शेतीपिकांच्या नुकसानीसाठी रु.२३.७१ लक्ष अशा रितीने एकूण रु.३३५१७.५० लक्ष (अक्षरी रुपये तीनशे पस्तीस कोटी सतरा लक्ष पंन्नास हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मिळणार?

या शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्ह्याला किती निधी वितरीत झाला आहे? हे तुम्ही खाली पाहू शकता.

  • अहमदनगर – १ कोटी ३४ लाख रुपये
  • अमरावती – १८ कोटी ०६ लाख रुपये
  • अकोला – १० कोटी ४१ लाख रुपये
  • यवतमाळ – १०६ कोटी ९६ लाख
  • बुलढाणा – ३४ लाख रुपये
  • वाशिम – १९५ कोटी ४७ लाख रुपये

📃 सविस्तर शासन निर्णय वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा 👉 शासन निर्णय

ही माहिती उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी आहे त्यामुळे ही पोस्ट जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा. तसेच ताज्या बातम्या, विविध शासकीय योजना, शेतीविषयक माहिती आणि इतरही बरीच उपयुक्त माहितीसाठी आमच्या बातमी कामाची (www.batamikamachi.com) या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top