शेतकरी मित्रांनो, दिवाळीआधीच शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून, खरीप हंगाम 2023 चा अग्रीम पीक विमा (Agrim Pik Vima 2023) म्हणून 35 लाख शेतकर्यांना 1700 कोटी रुपये दिवाळी आधीच वितरीत केले जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री मा. धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. बहुतांश ठिकाणी दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचेही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
Agrim Pik Vima 2023
यावर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यात पिकांच्या उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
असे असताना अग्रीम पीक विमा (Agrim Pik Vima 2023) रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट वितरण करण्यास विमा कंपन्यांनी सुरुवात केली आहे. खरीप हंगामात विविध जिल्ह्यात हवामानाच्या असमतोलामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. एक रुपयात पीक विमा योजनेमध्ये राज्यातील 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
2023 Agrim Pik Vima : अग्रीम पीक विमा दिवाळीआधीच मिळणार, पीक विम्यासाठी 628 कोटी मंजूर
अंतरिम नुकसान भरपाई (MSA) अंतर्गत विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पीक विमा कंपन्यांना अधिसूचना निर्गमित करून 25 टक्के अग्रीम पीक विमा देण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यावरून बहुतांश कंपन्यानी विभागीय व राज्यस्तरावर अपील केलेले होते.
अपिलांच्या सुनावण्या होत गेल्या, त्याप्रमाणे आतापर्यंत संबंधित विमा कंपन्यांनी एकूण 1700 कोटी रुपये रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तसेच जसजसे अपिलांचे निकाल येतील, त्यानुसार शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याची अग्रीम रक्कम यामध्ये मोठी वाढ होणार आहे.
अग्रीम पीक विम्याच्या सुनावण्या तातडीने होणार
अग्रीमबाबत समस्या तातडीने सोडविण्यासंदर्भात कृषिमंत्री श्री.मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. यानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी संबंधित पीक विमा कंपन्यांच्या सुनावण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही विम्याबाबत आग्रही होते. तसेच उर्वरित जिल्ह्यातील सर्वेक्षण, अपिलावरील सुनावण्या आदी बाबी तातडीने पूर्ण करण्याबाबत विभागाला सूचना मंत्री श्री.मुंडे यांनी केल्या आहेत. त्यानुसार आता अग्रीम पीक विमा {Agrim Pik Vima 2023} वितरणाची कार्यवाही बर्याच जिल्ह्यात सुरू झाली आहे.