Ativrushti Nuksan Bharpai 2022: शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2022-23 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसाने शेतीपकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai) जाहीर केली होती.
Ativrushti Nuksan Bharpai 2022
नुकसानग्रस्त शेतकर्यांना 15 सप्टेंबर 2022 पर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाईचे {Ativrushti Nuksan Bharpai} वाटप करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली होती.
अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप आता नवीन पद्धतीने, जाणून घ्या नवीन पद्धत
परंतू घोषणा करून 5 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान बर्याच शेतकर्यांचे खात्यात अजूनही जमा झालेले नाही. काही ठिकाणी थोड्या फार प्रमाणात अतिवृष्टी मदतीचे वाटप झालेले आहे. पण मोठ्या प्रमाणावर शेतकरी अजूनही अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांना उर्वरित नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सध्या राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात विचारण्यात आलेल्या एक प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, अशा शेतकर्यांना 31 मार्च 2023 पूर्वी नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
याबाबत सदस्य प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 300 कोटींची अतिरिक्त मागणी आहे. यामध्ये तांत्रिक समितीद्वारे वैधता तपासण्यात येईल. शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या 6 हजार 800 कोटींपैकी 6 हजार कोटींचे वाटप झाले आहे.
📽️ नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे 👉 येथे क्लिक करून पहा
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. आतापर्यंत अनुदानापोटी 4 हजार 700 कोटी वितरित करण्यात आले असून जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
Ativrushti Nuksan Bharpai याद्या पहा
मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप झाल्यानंतर ज्या शेतकर्यांना मदतीचे वाटप करण्यात आले आहे, मदतीच्या तपशीलासह त्यांच्या याद्या {Ativrushti Nuksan Bharpai List Maharashtra} संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश शासन निर्णयाद्वारे देण्यात आले होते. तर आता बर्याच जिल्ह्यात लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. काही जिल्ह्यांच्या लाभार्थी याद्या तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करून पाहू शकता.
अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या येथे पहा
#विधानसभाप्रश्नोत्तरे
अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईपोटी ७५५ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. ज्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्या शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 28, 2023