Ativrushti Nuksan Bharpai 2023: राज्यात जून ते ऑक्टोबर, 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीकरिता मदत (Ativrushti Nuksan Bharpai 2023) देण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबतचा (पावसाळी हंगाम 2023) महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
त्यानुसार 10 जिल्ह्यांना एकूण 61 कोटी 71 लाख रुपयांची नुकसान भरपाई वितरीत करण्यात येणार आहे. तर आजच्या ह्या लेखात आपण या शासन निर्णयाचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकर्यांना किती नुकसान भरपाई मिळेल? हेसुद्धा जाणून घेणार आहोत.
Ativrushti Nuksan Bharpai 2023
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस – 2022/प्र.क्र.349/म-3, दि.27.03.2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. तसेच दि.09/11/2023 च्या शासन निर्णयानुसार शेतीपिकांच्या नुकसानीकरिता 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
जून ते ऑक्टोबर, 2023 या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडून दि.02.11.2023, विभागीय आयुक्त, नागपूर यांचेकडून दि.04.12.2023, दि.05.12.2023 व दि.13.12.2023 आणि विभागीय आयुक्त, अमरावती यांचेकडून दि.15.12.2023, दि.19.12.2023, च्या पत्रान्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे. त्यानुसार ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खाली पाहू शकता.
📃 सविस्तर शासन निर्णय येथे पहा
शासन निर्णय
जून ते ऑक्टोबर, 2023 या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.6171.91 लक्ष (अक्षरी रुपये एकसष्ट कोटी एकाहत्तर लक्ष एक्यान्नव हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत जिल्हानिहाय कशी असेल हे आपण खाली पाहुयात.
Ativrushti Nuksan Bharpai 2023 जिल्हानिहाय तपशील
- नाशिक विभाग
- एकूण शेतकरी – 8880
- एकूण मंजूर मदत – 09 कोटी 60 लाख 23 हजार रुपये
1) जिल्हा नाशिक
- एकूण शेतकरी – 22
- एकूण मंजूर मदत – 1 लाख रुपये
2) जिल्हा धुळे
- एकूण शेतकरी – 967
- एकूण मंजूर मदत – 10 कोटी 04 लाख 82 हजार रुपये
3) जिल्हा जळगाव
- एकूण शेतकरी – 7799
- एकूण मंजूर मदत – 8 कोटी 51 लाख 81 हजार रुपये
4) जिल्हा अहमदनगर
- एकूण शेतकरी – 92
- एकूण मंजूर मदत – 2 लाख 60 हजार रुपये
- नागपूर विभाग
- एकूण शेतकरी – 18718
- एकूण मंजूर मदत – 13 कोटी 61 लाख 88 हजार रुपये
1) जिल्हा नागपूर
- एकूण शेतकरी – 5829
- एकूण मंजूर मदत – 4 कोटी 72 लाख 61 हजार रुपये
2) जिल्हा चंद्रपूर
- एकूण शेतकरी – 10483
- एकूण मंजूर मदत – 8 कोटी 37 लाख 44 हजार रुपये
3) जिल्हा गोंदिया
- एकूण शेतकरी – 2046
- एकूण मंजूर मदत – 51 लाख 83 हजार रुपये
- अमरावती विभाग
- एकूण शेतकरी – 37000
- एकूण मंजूर मदत – 24 कोटी 21 लाख 92 हजार रुपये
1) जिल्हा अमरावती
- एकूण शेतकरी – 29147
- एकूण मंजूर मदत – 24 कोटी 18 लाख 27 हजार रुपये
2) जिल्हा यवतमाळ
- एकूण शेतकरी – 60
- एकूण मंजूर मदत – 3 लाख 65 हजार रुपये
3) जिल्हा बुलढाणा
- एकूण शेतकरी – 7793
- एकूण मंजूर मदत – 14 कोटी 23 लाख 09 हजार रुपये
अशाप्रकारे दिनांक 24 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील वरील 10 जिल्ह्यातील एकूण 64598 शेतकर्यांना 61 कोटी 71 लाख 91 हजार रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.