nuksan bharpai list

“या” जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी आली | Ativrushti Nuksan Bharpai List 2022 download

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ativrushti Nuksan Bharpai List 2022:- शेतकरी मित्रांनो, राज्यात जुन ते ऑगस्ट मध्ये तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. सुमारे सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांचे पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई (Ativrushti Nuksan Bharpai) म्हणून शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. हा निधी अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया वेगात सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी याधीच दिली होती. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यात तालुकानिहाय अतिवृष्टी मदत किती मिळाली आणि नांदेड जिल्ह्यातील तालुकानिहाय अतिवृष्टी याद्या मोबाईल वर डाऊनलोड कशा कराव्या, हे आपण ह्या लेखात जाणून घेणार आहोत.

Shetkari Nuksan Bharpai 2022

अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. जुलै महिन्यात तब्बल ६०६ मिलिमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. या अतिवृष्टीचा फटका सात लाख ४१ हजार ९४६ शेतकऱ्यांना बसला. (Shetkari Nuksan Bharpai) यात पाच लाख २७ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती, बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने नांदेड जिल्ह्यासाठी ७१७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात अतिवृष्टी मदत जमा करून आता याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. खालील लिंकवर सर्व याद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. Ativrushti Nuksan Bharpai List 2022

अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

हा निधी शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी सदर निधी वाटप झाला आहे. नांदेड जिल्ह्याला यापूर्वीच ८ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार इतर जिल्ह्याच्या अगोदर निधी मिळाला. एकूण जिल्ह्यास ७१७ कोटी ८८ लाख रुपये निधी प्राप्त झाला. या निधीचे जिल्हा बँकेच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहे.

तालुकानिहाय वितरित निधी

नांदेड- २५ कोटी ८९ लाख,
अर्धापूर -२९ कोटी १६ लाख,
कंधार -५५ कोटी १२ लाख,
लोहा ६१ कोटी ५ लाख,
देगलूर ४२ कोटी ९५ लाख,
मुखेड ५४ कोटी ७० लाख,
बिलोली- ४० कोटी ३५ लाख,
नायगाव- ४५ कोटी ५ लाख,
धर्माबाद- २९ कोटी ५३ लाख,
उमरी- ४० कोटी ११ लाख,
भोकर- ५२ कोटी ४३ लाख,
मुदखेड- २४ कोटी २७ लाख,
हदगाव-८५ कोटी २० लाख,
हिमायतनगर- ४२ कोटी ७४ लाख,
किनवट-६७ कोटी ९ लाख,
माहूर- २२ कोटी २० लाख.

नांदेड जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top