Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra

अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाची नवीन पद्धत | Ativrushti Nuksan Bharpai New Payment Process

Ativrushti Nuksan Bharpai New Payment Process: मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना मदतीचा निधी यापुढे प्रचलित जुन्या कार्यपध्दतीनुसार वितरीत न करता MAHA IT यांचेकडून यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या ऑनलाइन पोर्टल वर सर्वसाधारण कार्यपध्दतीनुसार वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ज्याप्रमाणे महात्मा जोतिराव फुले ‘शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबविण्यात आली, ज्यामध्ये पात्र शेतकर्‍यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टल वर प्रसिद्ध करून शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्यात आले होते, त्याच प्रमाणे अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाची नवीन पद्धत (Ativrushti Nuksan Bharpai New Payment Process) असणार आहे. सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.

Ativrushti Nuksan Bharpai New Payment Process

  1. सर्व संबंधित तहसीलदार हे शासन निर्णय सोबतच्या विवरणपत्रामधील रकान्यात नमूद केलेल्या नमुन्यात पात्र शेतकऱ्यांची सर्व माहिती Excel format मध्ये भरून, MAHA IT या कंपनीकडून त्यांना उपलब्ध करून दिलेल्या लॉगीनद्वारे याकरिता विकसित केलेल्या पोर्टल वर पाठवतील. तहसीलदार यांचेकडून संगणकीय प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेल्या लाभार्थ्यांच्या याद्य जिल्हाधिकारी यांचे वतीने त्यांनी प्राधिकृत केल्यानुसार संबंधित प्रांतअधिकारी किंवा निवासी उप जिल्हाधिकारी यांच्याकडून अनुमोदीत करण्यात येतील. या याद्या शासनाने यासाठी मंजूर केलेल्या जिल्हानिहाय निधीच्या मर्यादेत अनुमोदीत करण्यात येतील.
  2. तहसीलदार यांनी उपलब्ध करुन दिलेल्या माहितीचे संगणकीय प्रणालीवर संस्करण करण्यात येईल. ज्या माहितीमध्ये त्रुटी आहेत ( उदा. लाभार्थ्यांची द्विरुक्ती, आधार क्रमांक अयोग्य असणे, इ.) अशी माहिती त्रुटी दूर करण्यासाठी तहसीलदार यांना संगणकीय प्रणालीवर दर्शविण्यात येईल. यामुळे एकाच व्यक्तीच्या नावे दोघांना अथवा एकाच बाधित क्षेत्राकरिता दोन व्यक्तींना होणारे रकमेचे प्रदान टाळता येईल. तहसिलदार यांना या माहितीमध्ये आवश्यक ती दुरूस्ती करता येईल आणि ही माहिती पुन्हा संगणकीय प्रणालीवर upload करता येईल. तहसिलदार व प्रांतअधिकारी किंवा निवासी उप जिल्हाधिकारी यांचेकरिता Standard Operating Procedure (SOP) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.

    📢 खरीप पीक विमा २०२२ ची राज्याची आकडेवारी येथे क्लिक करून पहा

  3. अशा रितीने संस्करीत झालेल्या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांचे नाव, बाधीत क्षेत्र, मदतीची रक्कम इ. तपशील दर्शविणारी विशिष्ट क्रमांक यादी (VK List) संगणकीय प्रणालीवर तयार करण्यात येईल. ही यादी तहसीलदार यांना पोर्टल वरुन डाऊनलोड करून घेता येईल. ही यादी ग्रामपंचायनिहाय देखील उपलब्ध असेल व ती प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाहीररित्या प्रसिध्द करण्यात येईल. या विशिष्ट क्रमांक यादीचे वाचन करण्यासाठी संबंधित तलाठी/ग्रामसेवक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.
  4. विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी यांना नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविणे आवश्यक राहिल. लाभार्थ्यांनी ओळख . पटविल्यानंतर विभागाने यासाठी खाते उघडलेल्या बँके मार्फत (SBI) रक्कम थेटरित्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल. जर विशिष्ट क्रमांक यादी मधील लाभार्थी नजिकच्या Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे बायोमेट्रिक ओळख पटविण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विशिष्ट क्रमांक यादीमध्ये काही माहिती (नाव, खाते क्रमांक, आधार क्रमांक इ.) चुकीची आढळल्यास, त्यांना त्याबाबत Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ यांना अवगत करण्याची सुविधा असेल. तद्नंतर Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र सदर माहिती दुरुस्तीसाठी संबंधित तहसिलदार यांना पाठवेल. तहसिलदार यांचेकडून सदर माहिती दुरुस्ती झाल्यानंतरच संबंधित लाभार्थ्यांना Common Service Centre (CSC-SPV) अथवा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे जाऊन त्यांची आधार क्रमांकाद्वारे बायोमेट्रिक ओळख पटविल्यानंतर SBI मार्फत रक्कम थेटरित्या त्यांच्या बँक खात्यात जमा होईल.
  5. हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यासाठी सध्या SBI मध्ये स्वतंत्र बँक खाते उघडण्यात येईल.
  6. नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीसाठी निधी उपलब्धतेकरिताचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास सादर केल्यानंतर, शासन मान्यतेने त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक तो निधी लेखाधिकारी आव्यप्र-6 यांना बीम्स प्रणालीवर वितरीत केल्यानंतर, ज्ञापनाद्वारे निदेशित केल्यानुसार लेखाधिकारी आव्यप्र-6 यांचेकडून आवश्यक निधी कोषागारामार्फत State bank of India या बँकेच्या खाती जमा करण्यात येईल आणि त्यामधून ओळख पटविलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या मदतीचे थेट वितरण लाभार्थ्यांच्या बँक खात्यात करण्यात येईल.
  7. आधार प्रमाणीकरणाची सेवा शेतकऱ्यांसाठी विनाशुल्क असेल.

📢 “या” जिल्ह्याची अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी 2022 पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

 

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top