Avkali Nuksan Bharpai

Avkali Nuksan Bharpai 2023 : नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Avkali Nuksan Bharpai 2023: राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून त्याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

या संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून (Avkali Nuksan Bharpai) वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

23 जिल्ह्यांसाठी 177 कोटींची नुकसान भरपाई मंजूर, पहा जिल्हानिहाय मदत

Avkali Nuksan Bharpai

धाराशिव जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली त्यानंतर वाडी बामणी (ता. धाराशिव) येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी खासदार रवी गायकवाड, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, छत्रपती संभाजी नगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी कुटुंबातील असल्याने आपल्याला शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाची जाणीव आहे. त्यामुळे या नुकसानाची माहिती घेण्यासाठी आपण शेतात आलो असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या येथे पहा

हे सरकार शेतकऱ्यांचे, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणारच!

राज्य शासन सदैव शेतकऱ्यांसोबत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची अधिक भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच सततच्या पावसाचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

धाराशिव जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने शेतपिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच 20 मोठी जनावरे दगावली असल्याची माहिती, जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दिली.

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी हे शेतकरी ठरतील अपात्र

 

अशाच प्रकारच्या शेतीविषयक माहिती आणि अपडेट्स करिता आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला भेट देत रहा.  

🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group

_________________________________________________

📢 23 जिल्ह्यांना 177 कोटी मदत मंजूर, पहा तुमच्या जिल्ह्याला किती मिळणार? | Avkali Nuksan Bharpai List

📢 350 रुपये कांदा अनुदान मिळणार, असा करा अर्ज | Kanda Anudan Arj

📢 नमो शेतकरी सन्मान निधी योजना | Namo Shetkari Sanman Nidhi Yojana 2023

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top