Avkali Nuksan Bharpai 2023

23 जिल्हे, 177 कोटींची नुकसान भरपाई मंजूर, पहा जिल्हानिहाय मदत | Avkali Nuksan Bharpai 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Avkali Nuksan Bharpai 2023: शेतकरी मित्रांनो, मार्च 2023 मध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने 177 कोटींची नुकसान भरपाई (Avkali Nuksan Bharpai 2023) मंजूर केली आहे.

यासंदर्भातील शासन निर्णय दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी जारी करण्यात आला आहे. शासन निर्णयान्वये 23 जिल्ह्यांसाठी एकूण 177 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तुमच्या जिल्ह्याला किती मदत? येथे क्लिक करून पहा

Avkali Nuksan Bharpai 2023

मित्रांनो, राज्यात माहे मार्च, 2023 (दि.4 ते 8 मार्च व दि. 16 ते 19 मार्च, 2023) या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे: शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान 33 टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात मार्च, 2023 या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत अनुज्ञेय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव दि. 8 मार्च, 2023 च्या शासन पत्रान्वये मागविण्यात आले होते. विभागीय आयुक्त, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांच्याकडून विहीत नमुन्यात निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार हा नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या येथे पहा

Avkali Nuksan Bharpai 2023  शासन निर्णय

मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व इतर नुकसानीसाठी एकूण रुपये 17780.61 लक्ष (अक्षरी रुपये एकशे सत्त्याहत्तर कोटी ऐंशी लक्ष एकसष्ट हजार फक्त)  इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय मंजूर निधी येथे क्लिक करून पहा

तर मित्रांनो, अशाप्रकारे मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व इतर नुकसानीसाठी एकूण रुपये 17780.61 लक्ष (अक्षरी रुपये एकशे सत्त्याहत्तर कोटी ऐंशी लक्ष एकसष्ट हजार फक्त)  इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतच्या शासन निर्णयाचा आढावा आपण या लेखात घेतला आहे.

🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top