Avkali Nuksan Bharpai Maharashtra

10 जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 27 कोटींची नुकसान भरपाई मिळणार, पहा तुमच्या जिल्ह्याला किती मिळेल नुकसान भरपाई? | Avkali Nuksan Bharpai Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Avkali Nuksan Bharpai Maharashtra: शेतकरी मित्रांनो, राज्यात मार्च 2023 मध्ये झालेल्या अवेळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना राज्य शासनाने त्यासाठी आता 27 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे.

त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे, त्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती निधी मिळणार आहे? {Avkali Nuksan Bharpai Maharashtra} हे आपण आजच्या ह्या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

23 जिल्ह्यांना 177 कोटी मंजूर, पहा तुमच्या जिल्ह्याला किती?

Avkali Nuksan Bharpai Maharashtra

मित्रांनो, राज्यात माहे मार्च, 2023 (दि.4 ते 8 मार्च व दि. 16 ते 19 मार्च, 2023) या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे: शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान 33 टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात मार्च, 2023 या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत अनुज्ञेय दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून विहित नमुन्यात प्रस्ताव दि. 8 मार्च, 2023 च्या शासन पत्रान्वये मागविण्यात आले होते. विभागीय आयुक्त, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधी मागणी प्रस्तावांनुसार दिनांक 10 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार 23 जिल्ह्यांना 177 कोटी मंजूर करण्यात आले होते.

आता विभागीय आयुक्त, कोकण व नागपूर यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत, त्यानुसार निधी वितरणास मान्यता देऊन दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Avkali Nuksan Bharpai Maharashtra  शासन निर्णय

मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व इतर नुकसानीसाठी एकूण रुपये 2718.52 लक्ष (अक्षरी रुपये सत्तावीस कोटी अठरा लक्ष बावन्न हजार फक्त)  इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हानिहाय मंजूर निधी येथे क्लिक करून पहा

तर मित्रांनो, अशाप्रकारे मार्च 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार शेतीपिके व इतर नुकसानीसाठी एकूण रुपये 2718.52 लक्ष (अक्षरी रुपये सत्तावीस कोटी अठरा लक्ष बावन्न हजार फक्त) इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतच्या शासन निर्णयाचा आढावा आपण या लेखात घेतला आहे.

🛑 अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये नक्की जॉइन व्हा 👉 Whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top