Crop Insurance 2023:

Crop Insurance 2023 : कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याची अग्रीम रक्कम जमा करणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Insurance 2023 : शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 च्या पीक विमा (Crop Insurance 2023) संदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आले असून, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची 25 टक्के अग्रीम रक्कम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

23 सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्ह‌्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी त्यांनी आज केली. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्ह्याचा दौरा केला होता.

👇👇👇

🏠 मोदी आवास घरकुल योजना, आता सर्वांसाठी घरे, पहा योजनेची संपूर्ण माहिती

नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव असून त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टी व बोगस रासायनिक खते वापरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Crop Insurance 2023

कृषीमंत्र्यांनी स्वतः शेताच्या बांधावर जात पाहणी केली. त्यांनी अडयाळी, उमरगाव, पाचगाव, विरखंडी या गावांना प्रामुख्याने भेटी दिल्या. तर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी त्यांना शेतकरी बांधवांनी विविध मागणीची निवेदने सादर केली. अनेक ठिकाणी त्यांनी ताफा थांबवून पाहणी केली.

येथे क्लिक करून आमच्या व्हाट्सअप चॅनल मध्ये जॉइन व्हा

जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रत्येक ठिकाणच्या शेतकऱ्यांनी त्यांनी सोयाबीनवर आलेल्या ‘पिवळ्या मोजाक व्हायरस’ या रोगामुळे झालेल्या नुकसानाची माहिती दिली.

सोयाबीनचे दाणे भरलेच नसल्याचे शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांना दाखविले. तसेच अनेक ठिकाणी अतिवृष्टीने संपूर्ण पीक वाया गेल्याने अक्षरशः उभ्या पीकावर रोटावेटर फिरवल्याची आपबीती शेतकऱ्यांनी सांगितली.

25 टक्के अग्रीम पीक विमा रक्कम दिवाळीपूर्वीच

कृषी मंत्र्यानी बांधावरच शेतकऱ्यांना आश्वस्त केले. ते म्हणाले, यावर्षी राज्यात 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी विक्रमी पीक विमा {Crop Insurance} काढला असून आंतरपिकाच्या सुद्धा विमा काढण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने एक रुपया शेतकऱ्याला भरायला सांगितला होता.

👇👇👇

अग्रीम पीक विमा दिवाळीआधीच मिळणार, पीक विम्यासाठी 628 कोटी मंजूर

उर्वरित विम्याचा प्रीमियम शासनाने भरला आहे. देशात हे पहिले उदाहरण आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्या सर्वांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या देय रकमेची 25 टक्के रक्कम दिवाळीपूर्वी खात्यामध्ये मिळणार आहे.

 

 

याशिवाय 65 मिलीमीटर पेक्षा जास्त सतत चार तास पाऊस ज्या ठिकाणी झाला आहे, अशा अतिवृष्टीमध्ये ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले, असेल तिथे राज्य आपदा मदत निधी (एसडीआरएफ) व केंद्रीय आपदा मदत निधीच्या (एनडीआरएफ) नियमानुसार शेतकऱ्यांना मदत करता येते. ही मदत देखील आम्ही लवकरच देणार आहे. उद्या मंगळवारी राज्याच्या कॅबिनेट बैठकीमध्ये हा विषय मांडणार असून यावर तत्काळ निर्णय होईल.

 

  • अशाच प्रकारच्या शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा. 👉👉 batamikamachi.com
  • विविध योजनांची माहिती आणि अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी आमचे व्हाट्सअप चॅनल नक्की जॉइन करा. 👉👉 Whatsapp Group

 

1 thought on “Crop Insurance 2023 : कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याची अग्रीम रक्कम जमा करणार”

  1. रेगुलर कर्जमाफीचे काय जे राहिले आहेत त्यांचे पैसे केव्हा मिळणार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top