खरीप पीक विमा २०२२ ची राज्यातील स्थिती | Crop Insurance Status Maharashtra

Crop Insurance Status Maharashtra: – शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील खरीप पीक विमा २०२२ (Crop Insurance Status Maharashtra) ची आकडेवारी आपण पाहुयात.

Crop Insurance Status Maharashtra

शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम २०२२ मध्ये झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी पीक विमाधारक शेतकर्‍यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून एकूण ५२ लाख १९५ पीक विमा क्लेम दाखल केले होते. त्यापैकी ५० लाख ४१ हजार ३५० क्लेमचे सर्वे पूर्ण करण्यात आले आहे. तर १ लाख ५८ हजार ८४५ क्लेमचे सर्वे अजूनही बाकी आहेत.

दाखल करण्यात आलेल्या एकूण ५२ लाख १९५ क्लेम मधून पीक विम्यासाठी एकूण २९ लाख ४७ हजार ४९७ शेतकरी पात्र ठरले आहेत. तर पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांना एकूण १४४६ कोटी ३५ लाख रूपये पीक विमा मंजूर (Pik Vima Manjur) करण्यात आला आहे.

या जिल्ह्यात २४१ कोटींचा पीक विमा मंजूर

 

१२ लाख २० हजार ८३१ क्लेम मंजूर, पण रक्कम निश्चित नाही

मित्रांनो, दाखल करण्यात आलेल्या ५२ लाख १९५ पीक विमा क्लेम पैकी १२ लाख २० हजार ८३१ क्लेम मंजूर असूनही निधी अभावी त्यासाठी रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. ही रक्कम निश्चित केल्यानंतर ह्या १२ लाख २० हजार ८३१ क्लेम साठी पुन्हा एकदा पीक विमा रक्कम (Crop Insurance) ही वाटप केल्या जाईल.

तर दाखल करण्यात आलेले ८ लाख ७३ हजार ६२ क्लेम अजूनही प्रलंबित, जे अद्याप मंजूर किंवा रद्द करण्यात आलेले नाही. ज्यामध्ये ४ लाख ८८ हजार क्लेम ऑनलाइन पद्धतीने तर ३ लाख १७ हजार ३६० क्लेम ऑफलाइन पद्धतीने दाखल करण्यात आलेले क्लेम आहेत. यामधून २ लाख ९८ हजार २१० क्लेम हे दुबार क्लेम आहेत. म्हणजेच बर्‍याच शेतकर्‍यांनी दोन वेळा क्लेम दाखल केले होते.

*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप

 

पीक विमा २०२२ वाटपाची स्थिती

मित्रांनो, खरीप हंगाम २०२२ च्या पीक विम्यासाठी (Crop Insurance) हे अपडेट हाती येईपर्यंत एकूण ११ लाख १० हजार ९१३ शेतकर्‍यांना  ४३३ कोटी २० लाख रूपये पीक विमा विविध जिल्ह्यात वाटप करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे १ लाख ६४ हजार २२३ शेतकर्‍यांना १००० रुपयांपेक्षाही कमी पीक विमा वाटप करण्यात आला आहे. ज्यामध्ये परभणी, जालना, नाशिक या ३ जिल्ह्यात १००० रुपयांपेक्षा कमी पीक विमा मिळालेले प्रत्येकी १५-१५ हजार शेतकरी आहेत. तर अकोला जिल्ह्यात ८ हजार शेतकर्‍यांना १००० रुपयांपेक्षाही कमी पीक विमा प्राप्त झाला आहे. असे एकूण राज्यभरातील १ लाख ६४ हजार २२३ शेतकर्‍यांना १००० रुपयांपेक्षाही कमी पीक विमा देण्यात आला आहे आणि त्याची एकूण रक्कम आहे ७ कोटी ७६ लाख रूपये इतकी आहे.

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे आजच्या ह्या लेखात आपण राज्यातील खरीप हंगाम २०२२ च्या पीक विम्याची विमा कंपनीकडून शासनाला सादर करण्यात आलेली अधिकृत आकडेवारी जाणून घेतली आहे. अशाच अपडेट्स करिता आमच्या वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top