DBT for Keshari Ration Card

रेशन कार्डवर पैसे मिळणार, असा करा अर्ज | DBT for Keshari Ration Card

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DBT for Keshari Ration Card: राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम (DBT for Keshari Ration Card) त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, यासाठी पात्र लाभार्थ्यांना अर्ज करावा लागणार आहे.

अर्ज कसा करावा?, अर्जाचा नमुना कुठे मिळेल?, अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील?, अर्ज कुठे सादर करावा? ही सर्व महत्त्वाची माहिती आपण आजच्या ह्या लेखात पाहणार आहोत.

DBT for Keshari Ration Card

मित्रांनो, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण (DBT for Keshari Ration Card) योजना सुरु करण्याबाबत दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी शासनाने मान्यता दिली आहे.

ह्या 14 जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना मिळणार लाभ

 

राज्यातील 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे दरमहिन्याला कुटुंबातील प्रतिसदस्य पाच किलो अन्नधान्य देण्यात येत होते. यामध्ये गहू प्रतिकिलो दोन रुपये आणि तांदूळ प्रतिकिलो तीन रुपये दराने मिळत होता.

या योजनेंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने कळविले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रतिलाभार्थी 150 रुपये इतकी रोख रक्कम डीबीटीद्वारे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

DBT for Keshari Ration Card Documents

या योजनेच्या लाभासाठी रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमवर (आरसीएमएस) नोंद असलेल्या पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांनी ‘डीबीटी’ साठी खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

  1. विहीत नमुन्यातील अर्ज (नमुना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा)
  2. रेशन कार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची छायांकित प्रत
  3. बँक तपशील स्पष्ट दिसेल अशी बँक पासबुकची छायांकित प्रत
  4. रेशन कार्ड वरील सर्व सदस्यांच्या आधार कार्डच्या छायांकित प्रती

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

 

वरील सर्व कागदपत्रे स्पष्ट दिसतील अशी छायांकित प्रत (झेरॉक्स) काढून वरील अर्जाच्या नमुन्यासोबत जोडून रास्तभाव दुकानदार किंवा सबंधित तलाठी यांच्याकडे तात्काळ जमा करावीत.

महिला कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यात जमा होणार रक्कम

या योजनेअंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला प्रमुखाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. जर काही पात्र शिधापत्रिकाधारक महिला कुटुंब प्रमुखाचे कोणत्याही बँकेत खाते नसल्यास अशा महिलांनी राष्ट्रीयकृत बँकेत खाते काढून घ्यावे व त्याची छायांकित प्रत अर्जासोबत जमा करावी. विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून जमा केल्यानंतर जानेवारी 2023 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी ₹150/- याप्रमाणे महिला कुटुंब प्रमुखाच्या आधार सलंग्न बँक खात्यात थेट रोख रक्कम जमा केली जाईल.

ही योजना कशी राबविली जाईल? कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

असा भरा अर्ज

विहित नमुन्यातील अर्ज कसा भरावा? थोडक्यात माहिती पाहुयात. त्यासाठी आधी अर्जाचा नमुना मिळवून घ्यावा. नमुना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

  • अर्जात सर्वप्रथम अर्जदाराचे किंवा कुटुंबप्रमुखाचे संपूर्ण नाव लिहावे.
  • त्यानंतर रेशन कार्डचा 12 अंकी RC नंबर टाकावा, जो तुमच्या रेशन कार्डवर नमूद केलेला असतो. रेशन कार्डचा 12 अंकी नंबर कसा चेक करावा? 👉 येथे क्लिक करून पहा
  • त्यानंतर आधार सलंग्न बँक खात्याचा संपूर्ण तपशील ज्यामध्ये बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार (वैयक्तिक किंवा संयुक्त), बँकेचा IFSC कोड इत्यादी संपूर्ण माहिती अचूकरीत्या सुवाच्च अक्षरात भरून घ्यावी.
  • आणि शेवटी कुटुंबप्रमुखाचे नाव लिहून स्वाक्षरी करावी अथवा डाव्या हाताचा अंगठा लावावा.

रेशन कार्डचा 12 अंकी नंबर येथे पहा

 

तर मित्रांनो, अशाप्रकारे एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण (DBT for Keshari Ration Card) योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top