Download Osmanabad Pik Vima List 2020: शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2020 संदर्भातील अतिशय दिलासादायक असे अपडेट आलेले आहे. खरीप 2020 पीक विम्यापोटी धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी बांधवांच्या याद्या व चेक बँकेत जमा करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी म्हणेच आजपासून प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा होणार आहे. तर त्याआधी आज आपण धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 च्या लाभार्थी याद्या (Download Osmanabad Pik Vima List 2020) पाहणार आहोत.
👇👇👇
शेतकर्यांना पीक विमा निश्चित मिळेल – कृषीमंत्री धनंजय मुंडे
Download Osmanabad Pik Vima List 2020
मित्रांनो, मा. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप 2020 पीक विमा प्रकरणी मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, प्राप्त रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. कळंब व तुळजापूर वगळता इतर तालुका कृषी अधिकारी यांनी लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या व चेक बँकेत जमा केले आहेत.
👇👇👇👇
कळंब व तुळजापूरच्या याद्या देखील आज तयार झाल्या असून गुरुवारी सकाळी बँकेत जमा होतील. सोमवार पासूनच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते, मात्र काही प्रशासकीय अडचणीमुळे उशिराने याद्या व चेक बँकेकडे प्राप्त झाले, त्यामुळे वितरण सुरु होऊ शकले नाही. गुरुवार पासून नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
119 कोटींचा पीक विमा मिळणार
या टप्यात जिल्ह्यातील 3 लाख 33 हजार 597 शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रु.3477 प्रमाणे रु.99.62 कोटी विमा वितरित करण्यात येत आहे.
त्याचबरोबर विमा कंपनीने पूर्वी मंजूर केलेल्या मात्र वितरित न केलेल्या 20 हजार 227 शेतकऱ्यांना रु.19.77 कोटी असे एकूण रु.119.39 कोटी वितरित करण्यात येत आहेत.