Rythu Bharosa Scheme : मित्रांनो, तेलंगणा सरकारने नुकतेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि शेतमजुरांसाठी दोन नव्या योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याची चर्चा देशभारत होत आहे. त्या दोन योजना म्हणजे रयतू भरोसा योजना आणि इंदिरा अम्मा आत्मीय भरोसा योजना. तर या दोन्ही योजनेतून शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना मोठी मदत दिली जाणार आहे.
Rythu Bharosa Scheme 2025
तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य आणि आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. रयतू भरोसा योजनेअंतर्गत (Rythu Bharosa Scheme) आता शेतकऱ्यांना प्रति एकर ₹12,000 वार्षिक मदत मिळणार आहे. ही रक्कम पूर्वी ₹10,000 होती, पण यंदा सरकारने ₹2,000 च्या वाढीसह नव्या बदलाची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांची शेतीची उचल वाढेल, आणि त्यांना शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाचा भार कमी करता येईल. यामुळे केवळ शेतकऱ्यांचंच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचंही पुनरुज्जीवन होण्याची आशा आहे.
शेतमजुरांसाठीही विशेष योजना – ‘इंदिरा अम्मा आत्मीय भरोसा’
भूमिहीन शेतमजूर कुटुंबांसाठी तेलंगणा सरकारने आणखी एक योजना लागू केली आहे. ‘इंदिरा अम्मा आत्मीय भरोसा’ या योजनेद्वारे प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला वार्षिक ₹12,000 ची मदत दिली जाईल.
योजना का खास आहे?
अनेक वेळा भूमिहीन शेतमजूर हे शेतकरी वर्गाच्या तुलनेत दुर्लक्षित राहतात. त्यांना स्थिर रोजगार नसल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत फारसा बदल होत नाही. तेलंगणा सरकारच्या या निर्णयामुळे भूमिहीन कुटुंबांना नवसंजीवनी मिळेल, आणि त्यांची आर्थिक अवस्था सुधारेल.
या योजनांची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार आहे?
दोन्ही योजनांची अंमलबजावणी 26 जानेवारी 2025 पासून सुरू होईल.
विशेष म्हणजे, या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कठीण अटी किंवा अडथळे ठेवलेले नाहीत. हे निर्णय तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी जाहीर केले असून, त्यांनी स्पष्ट केले की, सरसकट सर्व पात्र शेतकरी आणि शेतमजुरांना ही मदत दिली जाईल.
मदतीपासून वंचित राहणाऱ्या जमिनी कोणत्या?
सर्व शेतीयोग्य जमिनीसाठी ही मदत लागू असेल. पण खालील प्रकारच्या जमिनींना याचा लाभ मिळणार नाही:
- बिगर शेतीयोग्य जमीन: उद्योग, रिअल इस्टेट प्रकल्प, किंवा इतर व्यावसायिक उपयोगासाठी असलेल्या जमिनी
- डोंगराळ किंवा खाणकामासाठी वापरण्यात येणाऱ्या जमीन: या जमिनी शेतीयोग्य नसल्यामुळे त्यांना या योजनेंतर्गत पात्रता नाही.
या योजनांचा उद्देश काय आहे?
तेलंगणा सरकारने या योजना का आणल्या? त्यामागील मुख्य उद्देश स्पष्ट आहे:
- शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य: शेतीसाठी लागणाऱ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी मदत
- शेतमजुरांनाही आर्थिक आधार: भूमिहीन वर्गासाठी नेहमीच दुर्लक्ष होतं; पण यावेळी त्यांनाही केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे.
- ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास: शेतीला पाठिंबा मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होईल.
महाराष्ट्रासाठी नवा दृष्टिकोन?
मित्रांनो, महाराष्ट्रातले शेतकरी आणि शेतमजूरदेखील अशाच योजनांची मागणी बर्याच काळापासून करत आहेत. कर्जमाफी, पीक विमा, किंवा अडचणीतील मदत अशा योजना अस्तित्वात असल्या तरी, त्या कायमस्वरूपी आधार देण्यात अपयशी ठरल्या आहेत. तेलंगणा सरकारने राबवलेल्या या योजनांमुळे महाराष्ट्राला एक नवा आदर्श मिळाला आहे.
मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?
- महाराष्ट्र सरकारनेही शेतकरी आणि शेतमजुरांसाठी अशीच आर्थिक मदत सुरू करावी का?
- तुम्हाला रयतू भरोसा आणि इंदिरा अम्मा आत्मीय भरोसा योजनांबद्दल काय वाटतं?
तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
ఆర్ధిక ఇబ్బందులు ఎన్నున్నా…
గత పాలకులు మోపిన …
అప్పుల భారం ఎంతున్నా…
అన్నదాతకు ఇచ్చిన మాట…
కర్షక లోకానికి చేసిన బాస…
ఆరునూరైనా నిలబెట్టుకోవాలన్న తపన…ఈ నూతన సంవత్సరాన…
రైతన్న జీవితాన…
వెలుగులు నింపాలన్న పట్టుదల…ఈ రోజు కేబినెట్ సమావేశంలో…
చారిత్రక నిర్ణయాలు… pic.twitter.com/mer1Vur8T8— Revanth Reddy (@revanth_anumula) January 4, 2025