maharashtra gram panchayat election 2022

“या” जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक, पहा संपूर्ण निवडणुकीचे वेळापत्रक | Gram Panchayat Election Maharashtra Schedule

Gram Panchayat Election Maharashtra Schedule:- मित्रांनो, राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांची (Maharashtra Gram Panchayat Election 2022) घोषणा झाली आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी काल दिनांक ०९ नोव्हेंबर २०२२ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली. तर या लेखाच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत निवडणूक २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक {Gram Panchayat Election Maharashtra Schedule} आणि कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

Gram Panchayat Election Maharashtra Schedule

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी खालीलप्रमाणे वेळापत्रक असणार आहे.

असे असेल वेळापत्रक

  • 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील.
  • नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.
  • नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
  • मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तसेच नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
  • मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या :

  • अहमदनगर- 203,
  • अकोला- 266,
  • अमरावती- 257,
  • औरंगाबाद- 219,
  • बीड- 704,
  • भंडारा- 363,
  • बुलडाणा- 279,
  • चंद्रपूर- 59,
  • धुळे- 128,
  • गडचिरोली- 27,
  • गोंदिया- 348,
  • हिंगोली- 62,
  • जळगाव- 140,
  • जालना- 266,
  • कोल्हापूर- 475,
  • लातूर- 351,
  • नागपूर- 237,
  • नंदुरबार- 123,
  • उस्मानाबाद- 166,
  • पालघर- 63,
  • परभणी- 128,
  • पुणे- 221,
  • रायगड- 240,
  • रत्नागिरी- 222,
  • सांगली- 452,
  • सातारा- 319,
  • सिंधुदूर्ग- 325,
  • सोलापूर- 189,
  • ठाणे- 42,
  • वर्धा- 113,
  • वाशीम- 287,
  • यवतमाळ- 100,
  • नांदेड- 181
  • नाशिक- 196
  • एकूण- 7,751

📢 आता विहीरीसाठी मिळणार ४ लाख रूपये, येथे क्लिक करून पहा

 

अशाच प्रकारे उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्या www.batamikamachi.com वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

*आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा: 👉👉 शेतकरी योजना ग्रुप

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top