Harbhara Variety:- शेतकरी मित्रांनो, आता उर्वरित ५ सुधारीत हरभरा वाणांची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
६) हरभरा – जाकी ९२१८
प्रसारीत वर्ष – सन २००५
संशोधन केंद्राचे नांव – पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
जमीन – मध्यम ते भारी काळी
हवामान – तापमान : किमान १०-१५° से, कमाल २५-३०° से.
पेरणीचा कालावधी – ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा
प्रती एकर बियाणे – ३० ते ३५ किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – १०५ ते ११० दिवस
उत्पादकता – सरासरी १८ ते २० क्विं./हे.
वैशिष्टे / गुणधर्म – मर रोग प्रतिकारक्षम, अधिक उत्पादनक्षमता, टपोरे दाणे, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित
७) हरभरा – पीकेव्ही – २
प्रसारीत वर्ष – सन २०००
विद्यापीठ – पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
जमीन – मध्यम ते भारी काळी
हवामान – तापमान – किमान १०-१५ अंश से. कमाल २५-३० अंश से.
पेरणीचा कालावधी – नोव्हेंबरचा पहिला आठवडा
प्रति एकर बियाणे – ४० ते ४५ किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – १०० ते १०५ दिवस
उत्पादकता – सरासरी १२ ते १५ क्विं./हे.,
वैशिष्टे/गुणधर्म – अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम,अधिक बाजारभाव
अखेर नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, पहिल्या हप्त्यासाठी 1720 कोटी रुपये मंजूर
८) हरभरा – पीकेव्ही – ४
प्रसारीत वर्ष – सन २००८
विद्यापीठ – पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
जमीन – मध्यम ते भारी काळी
हवामान – तापमान – किमान १०-१५ अंश से. कमाल २५-३० अंश से.
पेरणीचा कालावधी – नोव्हेंबरचा पहिला आठवडा
प्रति एकर बियाणे – ३५ ते ४० किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – १०० ते ११० दिवस
उत्पादकता – सरासरी १० ते १२ क्विं./हे.,
वैशिष्टे/गुणधर्म – अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम,अधिक बाजारभाव
९) हरभरा – फुले विक्रम
प्रसारीत वर्ष – सन २०१६
विद्यापीठ – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी द्वारे प्रसारीत
जमीन – मध्यम ते भारी काळी, ४५ ते ६० सें. मी. खोली
हवामान – तापमान – किमान १०-१५ अंश से. कमाल २५-३० अंश से.
पेरणीचा कालावधी – जिरायत : २० सप्टें. ते १० ऑक्टो., बागायत : २० ऑक्टो. ते १० नोव्हें.
प्रति एकर बियाणे – ३० किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – १०५ ते ११० दिवस
उत्पादकता – जिरायत – सरासरी १६.०० क्विं./हे., बागायत – सरासरी २२.०० क्विं./हे., उशीरा पेर सरासरी २१.०० क्विं./हे.
वैशिष्टे/गुणधर्म – वाढीचा कल उंच वाढणारा असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने काढणी करण्याकरिता योग्य वाण, मध्यम आकाराचे दाणे, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित, मर रोगास प्रतिकारक्षम
१०) हरभरा – फुले विक्रांत
प्रसारीत वर्ष – सन २०१७
विद्यापीठ – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी द्वारे प्रसारीत
जमीन – मध्यम ते भारी काळी, ४५ ते ६० सें. मी. खोली
हवामान – तापमान – किमान १०-१५ अंश से. कमाल २५-३० अंश से.
पेरणीचा कालावधी – जिरायत : २० सप्टें. ते १० ऑक्टो., बागायत : २० ऑक्टो. ते १० नोव्हें.
प्रति एकर बियाणे – ३० किलो
पीक परिपक्वतेचा कालावधी – १०५ ते ११० दिवस
उत्पादकता – जिरायत – बागायत – सरासरी २०.०० क्विं./हे.,
वैशिष्टे/गुणधर्म – पिवळसर तांबुस मध्यम आकराचे दाणे, मर रोगास प्रतिकारक्षम, बागायत पेरणीस योग्य, महाराष्ट्र, गुजरात, प. मध्यप्रदेश व द. राजस्थान राज्यासाठी प्रसारीत
तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे आपण आजच्या ह्या लेखामध्ये हरभरा पिकाचे टॉप १० सुधारीत वाणांची (Top 10 Harbhara Variety) थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर इतर शेतकरी बांधवांना सुद्धा ही पोस्ट नक्की शेअर करा. तसेच शेतीविषयक बर्याच उपयुक्त माहितीसाठी आमची वेबसाईट http://www.batamikamachi.com ला नेहमी भेट देत रहा.