IND vs NZ 3rd T20 Highlights: आज 1 फेब्रुवारी 2023 रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी20 मालिकेचा तिसरा आणि निर्णायक टी20 सामना IND vs NZ 3rd T20 Highlights अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी दणदणीत आणि एकतर्फी पराभव केला. या विजयासह भारताने टी20 मालिका 2-1 अशी जिंकली.
तिसर्या आणि निर्णायक सामन्यात भारताकडून सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्या हे विजयाचे शिल्पकार ठरले. विशेष म्हणजे टी20 मालिकेआधी भारताने न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेतही मात दिली होती.
IND vs NZ 3rd T20 Highlights
तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णायक सामन्यात युवा सलामीवीर शुभमन गिलने भारताकडून सर्वाधिक धावा काढल्या, त्याने 63 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या साहाय्याने 126 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीमुळे भारताने निर्धारित 20 षटकांत प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावून 234 धावा केल्या. IND vs NZ 3rd T20 Highlights
शुभमन गिलसोबत सलामीला आलेला यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन पुन्हा एकदा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आणि अवघ्या 1 धावा करून बाद झाला. त्याला माईक ब्रेसवेलने पायचीत करत माघारी धाडले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या राहुल त्रिपाठीने 22 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आक्रमक 44 धावा केल्या. राहुल त्रिपाठीचा जम बसत आहे, असे वाटू लागले असतानाच लेगस्पिनर ईश सोढीने त्याला लॉकी फर्ग्युसनच्या हाती झेलबाद केले.
शेवटच्या 10 षटकात भारताने 132 धावा ठोकल्या
10 षटकानंतर 2 बाद 102 अशी स्थिति असताना भारत 200 धावांचा टप्पा सहजरित्या ओलांडणार असल्याचे निश्चित झाले होते. त्रिपाठी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने 13 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 24 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तो बाद होताच शुभमन गिलने धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली आणि अवघ्या 54 चेंडूत आपले टी20 क्रिकेट मधील पहिले शतक पूर्ण केले. त्याला कर्णधार हार्दिक पांड्याने सुरेख साथ दिली. पांड्या 17 चेंडूंत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 30 धावा काढून बाद झाला. सलामीवीर शुभमन गिल 63 चेंडूत 126 धावा आणि दिपक हुडा 2 चेंडूत 2 धावा काढून शेवटपर्यंत नाबाद राहिले.
न्यूझीलंडकडून मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, ब्लेअर टिकनर आणि डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचा संघ अवघ्या 66 धावांत गारद
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या किवी संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच चेंडूपासून भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडवर दबाव कायम ठेवला. फिन ऍलन अवघ्या 3 धावा करून बाद झाला. डेव्हॉन कॉनवेही 1 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्क चॅपमन खाते न उघडता बाद झाला. ग्लेन फिलिप्सही 2 धावा करून हार्दिक पांड्याचा बळी ठरला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 35 धावा केल्या. न्यूझीलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 12.1 षटकात 66 धावांत ऑलआऊट झाला. भारताने हा सामना 168 धावांच्या मोठ्या अंतराने जिंकला.
भारतासाठी कर्णधार हार्दिक पंड्याने 4 षटकात 16 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. पांड्याशिवाय अर्शदीप सिंग, शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
कर्णधार पांड्या ठरला मालिकावीर
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शन करणार्या भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. पांड्याने 3 सामन्यांच्या या मालिकेत अष्टपैलू प्रदर्शन करत फलंदाजीत 3 सामन्यात 66 धावा आणि गोलंदाजीत 3 सामन्यात 74 धावा देत 5 गडी बाद केले. तर दुसरीकडे तिसर्या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करणार्या शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. IND vs NZ 3rd T20 Highlights
ताज्या बातम्यासाठी भेट देत रहा 👉 https://batamikamachi.com/